Next
‘महिंद्रा’ व ‘बीएमसी’चा सहयोग
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this storyमुंबई : महिंद्रा समूहाने शाश्वततेबद्दलच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहयोगाने प्लास्टिकच्या परिणामांविषयी जागृती करण्यासाठी व प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे.

भारतात दररोज १५ हजार टनांहून अधिक प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी सहा टन कचरा गोळा केला जात नाही व तसाच साचून राहतो. मुंबईमध्ये दररोज सात हजार ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी अंदाजे नऊ टक्के कचरा प्लास्टिक कचरा असतो, असे २०१४ मधील अभ्यासामध्ये नमूद केले आहे.

प्लास्टिक प्रदूषणामुळे सागरी जीवनावर होणारा परिणाम विचारात घेता, या वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘बीट प्लास्टिक पोल्यूशन’ ही संकल्पना ठरवण्यात आली आहे आणि भारत हा यजमान देश आहे. व्यवसाय व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून विचार करता, पर्यावरण हा महिंद्रा समूहासाठी महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी चालवले जाणारे हे अभियान मे २२ रोजी सुरू करण्यात आले आणि त्याची सांगता जागतिक पर्यावरण दिनी (पाच जून) होणार आहे. आतापर्यंत महिंद्रा समूहाने १५० किलोहून अधिक प्लास्टिक संकलित केले आहे व ते बीएमसीकडे सुपुर्द केले जाणार आहे (सिंगल युज).

सहयोगाचा भाग म्हणून बीएमसी प्लास्टिक संकलित करणार आहे व त्यावर पुनःप्रक्रिया करून उपयुक्त उत्पादने तयार करणार आहे. ‘महिंद्रा’ने अन्य स्वरूपातील प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी एनजीओ गुंजबरोबर भागीदारी केली आहे. सिंगल युज प्लास्टिक सोडून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना उत्तेजन देणे आणि राज्यभरातील महिंद्रा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे, हे महिंद्रा समूहाचे उद्दिष्ट आहे.

प्लास्टिक प्रदूषण व पर्यावरण याविषयीच्या वर्तनामध्ये मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीने महिंद्राने स्थानिक समुदायालाही प्लास्टिक प्रदूषणाविषयी माहिती दिली आहे. यासाठी, समूहाने राइज फॉर गुड या उपक्रमांतर्गत, बीडीडी चाळींमध्ये पथनाट्य सादर करण्यासाठी विश्व सिने प्रॉडक्श्न्स प्रायव्हेट लिमिटेडमधील कलाकारांनाही आमंत्रित केले होते. हे पथनाट्य, व्यक्ती व संस्था यांना सकारात्मक बदल करण्याचे आवाहन करण्याच्या हेतूने साकारलेल्या समूहाच्या #ButThisIsNotEnough[Eng] #ButThisIsNotEnough [Hindi] अभियानाच्या अनुषंगाने सादर करण्यात आला.

महिंद्रा समूहाचे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर अनिर्बन घोष म्हणाले, ‘आपल्याला प्लास्टिक पिशवी वापरणे सोयीचे वाटते; पण त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होते, हेही विचारात घ्यायला हवे. समुद्राची इकोसंस्था उद्ध्वस्त होणे, जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होणे व सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण होणे थांबवायला हवे. सरकारने अतिशय योग्य वेळी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. महिंद्राने राज्यभरातील आमच्या सहकाऱ्यांद्वारे प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या हेतूने बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी केली आहे. #ButThisIsNotEnough. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येणे गरजेचे आहे.’

‘बीएमसी’चे सहाय्यक आयुक्त किरण एस. दिघवकर यांनी सांगितले, ‘प्लास्टिक बंदी करण्यासाठी आणि मुंबई शहर स्वच्छ राखण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने महिंद्रा समूह करत असलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. हे अतिशय प्रेरणादायी आहे. अशा सहयोगामुळे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होते व चांगले परिणाम घडून येतात. प्लास्टिक प्रदूषण ही समस्या गंभीर होत आहे व ती सोडवण्यासाठी ‘बीएमसी’ला कंपन्यांकडून व लोकांकडून मदतीची आवश्यकता आहे. मानव, वन्यजीवन, जमीन व जलमार्ग यांना प्लास्टिक प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झाला असून, हे प्रदूषण त्यांच्या जीवितावर दुष्परिणाम करत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link