Next
‘राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर आणणार’
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 02:28 PM
15 0 0
Share this story

पालघर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी समर्थपणे पाय रोवून कसा ठेवला आहे, ते पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे या बळावर पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून काम करूया,’ असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा पालघर, ठाणे, कल्याण, नवीमुंबई दौरा सुरू झाला. या दौऱ्यामध्ये पालघरमध्ये जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी पाटील आणि नाईक यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पक्षबांधणी, वाढ आणि बुथ कमिट्यांची बांधणी यावर कशापद्धतीने भर दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

या मेळाव्यामध्ये माजी मंत्री नाईक, आमदार आनंद ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी पक्षाची स्थिती आणि त्यावर कशापद्धतीने काम सुरू आहे याबाबत माहिती दिली.

पालघरमधील कार्यकारिणी मेळाव्याला आमदार ठाकूर, कामगार नेते संजय वढावकर, जिल्हाध्यक्ष भुसारा, प्रदेश चिटणीस संदीप वैद्य, जिल्हा सरचिटणीस अशोक चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा निलम राऊत, शहर तालुकाध्यक्ष विरेंद्र पाटील यांसह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link