Next
मर्सिडीजचे तांत्रिक तज्ज्ञ ग्राहकांच्या भेटीला
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : मर्सिडीज बेंझ या आंतरराष्ट्रीय कार निर्मिती कंपनीच्या तांत्रिक तज्ज्ञांशी ग्राहकांचा संवाद व्हावा याबरोबरच आपल्या कारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईव्ह चेक अप ग्राहकांना पाहता यावा या उद्देशाने मर्सिडीज बेंझ इंडिया आणि घाटगे ग्रुपच्या वाघोली येथील ट्रिनिटी मोटर्स यांच्या वतीने ‘सर्व्हिस क्लिनिक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘वाघोली येथील ट्रिनिटी मोटर्सच्या शोरूममध्ये येत्या मंगळवार दि. १९ जून ते शुक्रवार दि. २२ जून दरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत हे ‘सर्व्हिस क्लिनिक’ कार्यरत राहणार असून, मर्सिडीजच्या सर्व ग्राहकांना या उपक्रमासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे’, अशी माहिती ट्रिनिटी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक गौरव घाटगे यांनी दिली. 

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘आम्ही नेहमीच आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून सर्व्हिस क्लिनिक हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्राहकांना देण्यात येणारी सेवा अधिक चांगल्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी हा आमचा उद्देश असून, यामुळे ग्राहकांचा मर्सिडीजचा अनुभव आणखी वृद्धिंगत होईल. या उपक्रमांतर्गत गाडीचा ड्राय वॉश डेमो, अपघातानंतरची दुरुस्ती प्रक्रिया याबरोबरच टायर्स व गाडीच्या इतर गोष्टींशी संबंधित माहितीही ग्राहकांना देण्यात येणार आहे.’

‘या उपक्रमाच्या माध्यमातून जर्मनी आणि देशभरातून मर्सिडीजचे प्रशिक्षित तांत्रिक तज्ज्ञ पुण्यातील ग्राहकांना थेट भेटणार आहेत. याशिवाय आपल्या मनातील शंकाही या वेळी ग्राहक या तज्ज्ञांना विचारू शकतील. तरी मर्सिडीजच्या ग्राहकांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा’, असे आवाहन घाटगे यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link