Next
‘हुजपा’ महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळ
नागेश शिंदे
Thursday, September 27, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील (हुजपा) महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे नुकतेच उद्घाटन झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. उद्घाटक म्हणून नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातार उपस्थित होते. तसेच डॉ. डी. के. कदम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे आयोजन ‘हुजपा’ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. डॉ. अभय दातार यांनी आपल्या भाषणातून राज्यशास्त्र या विषयातील रोजगाराच्या संधी आणि नेतृत्व विकास यावर उपस्थित विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख डॉ. वसंत कदम यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. जी. जी. राहुलवाड यांनी केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search