Next
आठवणींचे पिंपळपान
BOI
Thursday, October 26 | 11:43 AM
15 0 0
Share this story

सुनील परचुरे यांच्या २५ कथांचा हा संग्रह आहे. साधारणतः शहरी, मध्यमवर्गीय वातावरणातील या कथा अस्वस्थ करतात.

‘चिल्का’ ही कथा या प्रकाराने मन सुन्न करणारी आहे. आपला मुलगा आणि पती डोळ्यासमोर अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत असूनही एका परक्या मुलीला सावरणारी अपर्णा या कथेत दिसते. ‘संस्कार’ या कथेत एकुलता एक मुलगा अमली पदार्थांच्या आहारी गेल्यावर डॉक्टर कुटुंबाची काय अवस्था होते हे सांगितले आहे. शेवटी पोटच्या मुलावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर येते.

‘निरपराध’ या कथेत शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या मुलाला आलेले दुर्दैवी अनुभव वाचायला मिळतात. ‘दुसरी आई’ या कथेत दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम असतानाही समाजाच्या दबावामुळे आपल्याच जातीतील मुलाशी विवाह लावून देणारे वडील दिसतात.

प्रकाशक : शमानील प्रकाशन
पाने : १६८
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link