Next
‘ओएलएक्स’ची वेबसाइट, अॅप नव्या रूपात
प्रेस रिलीज
Wednesday, March 27, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील ऑनलाइन छोट्या जाहिरातींच्या व्यवसायात सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘ओएलएक्स’ने आपल्या नव्या धोरणानुसार जागतिक स्तरावर ब्रँडच्या स्वरूपात आमूलाग्र आणि नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. याचाच भाग म्हणून ‘ओएलएक्स’ने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची जोड देत वेबसाइट आणि अॅप अधिक सुरक्षित केले आहे.

जगभरातील तरुणांना अधिक चांगल्या तऱ्हेने आकर्षित करणे आणि त्यांच्या आयुष्यात काही स्मार्ट संधी निर्माण करणे हा या नव्या ब्रँड धोरणाचा उद्देश आहे. ‘ओएलएक्स’ ऑनलाइन छोट्या जाहिरातींच्या व्यवसायात २००६पासून आघाडीवर आहे. वापरलेल्या वस्तू कोणत्याही असोत, त्याची विक्री-खरेदी किंवा अदलाबदली या व्यवहारांसाठी ग्राहकांनी ‘ओएलएक्स’ला सर्वोच्च पसंती दिली आहे. आज ‘ओएलएक्स’ जगभरातील कोट्यवधी ग्राहकांना सेवा पुरवते.

नव्या स्वरूपातील ब्रॅंडिंग सात विविध प्रादेशिक भाषांमध्ये मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया यावर जाहिरात स्वरूपात सादर केले जात आहे. या जाहिरात मोहिमेत कंपनीच्या ‘कोणतीही स्थिती तात्पुरती असते; आयुष्यातला एक मैलाचा दगड असते आणि या प्रत्येक स्थितीत आपल्याला निवड करावी लागते’ या तत्वज्ञानावर बहर देण्यात आला आहे. या सहा जाहिरातपटांतून ‘ओएलएक्स’चे चाहते नवे अॅप वापरून आपल्या बदलत्या परिस्थितीला सामोरे जात असल्याचे दाखविले आहे.  

सादर केलेल्या या ब्रँडमध्ये कंपनीची एक नवी दिशा परावर्तित होत आहे. यात कंपनी ग्राहकांना जास्त सेवा आणि त्यांच्या व्यवसायासाठी, कुटुंबासाठी आणि जीवनशैलीत जास्त फायदा मिळवण्याच्या संधी घेऊन आली आहे. कंपनीचे नवे बोधचिन्ह (लोगो) हाच विचार ‘निवडीचे स्वातंत्र्य’ या तत्त्वाचा पुरस्कार करून ग्राहकांपुढे आणते. अकरा वर्षांनी झालेल्या या ब्रँड बदलात नवी ओळख आणि आश्वासक स्वर यामुळे एक आशादायी भाव निर्माण झाला आहे.  

‘ओएलएक्स इंडिया’चे महाव्यवस्थापक सुशील कुमार म्हणाले, ‘आम्ही चित्रमय भाषा आणि खास शैली आणि ढंग असलेला आवाज वापरून एक कल्पना मांडली आहे. मिलेनिअल तरुणांना ही कल्पना नक्की आवडेल. स्मार्ट चॉइस आणि ‘सेट है’ ही कल्पना ग्राहकांना आणि पर्यायाने सर्व समाजाला फायदेकारक ठरणार आहे.’

‘आपण एखादा स्मार्ट निर्णय घेतला आहे असे जाणवल्यावर जी भावना मनात येते तीच ‘सेट है.’ जीवनात येणाऱ्या प्रसंगांचा सामना आत्मविश्वासाने करण्यासाठी ‘ओएलएक्स’ ग्राहकांना मदत करू शकते याचा अविष्कार म्हणजे ‘सेट है.’ जीवनात काही नव्याने सुरू करताना, व्यवसाय वाढल्याने ऑफिसचा विस्तार करताना किंवा बाळाच्या आगमनासाठी घर सजवत असताना ‘ओएलएक्स’च्या ग्राहकांना ‘सेट है’ हीच टॅगलाइन आठवते. वेळ, पैसे आणि सामग्री यांबद्दलचे ‘स्मार्ट’ निर्णय ग्राहकांना घेता येतील यासाठी योग्य स्थिती आम्ही निर्माण करतो,’ असे सुशील कुमार यांनी सांगितले.

नव्या प्रगत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या क्षमतेची जोड मिळाल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या अपेक्षा आणि गरजा यानुसार नेमकी माहिती मिळू शकणार आहे. त्यांना आता त्यांच्या आसपासच्याच परिसरातीलच नव्हे, तर विविध ठिकाणच्या पोस्ट दिसतील. वेबसाइटवर होणाऱ्या पोस्ट विश्वासार्ह असाव्या यासाठी जास्तीचे निकष लावण्यात आले आहेत. आता ग्राहकांना अपमानकारक किंवा अनेकांना पाठवल्या जात असलेल्या पोस्टबद्दल (स्पॅम) साइट व्यवस्थापकांना कळवणे सुलभ झाले आहे. या शिवाय खरेदीदार आणि विकणारे यांची माहिती सुरक्षित रहावी यासाठीच्या सूचना चॅटमार्फत दिल्या जातात. नव्या व्हॉइस मेसेजिंगच्या सोयीमुळे ग्राहकांना एकमेकांना फोन नंबर द्यावे लागत नाहीत. ‘ओएलएक्स’ वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांचे व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने करता यावे यावर या सर्व प्रयत्नांचा रोख आहे, असा संदेश यातून मिळतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search