Next
ज्वारीचा पिझ्झा
BOI
Wednesday, December 13 | 09:45 AM
15 0 0
Share this story

ज्वारीचा पिझ्झा

कडधान्यांबरोबर रोजच्या जेवणात वापरले जाणारे गहू आणि ज्वारी यांतूनही अनेक पौष्टिक घटक मिळतात. परंतु रोज त्याची पोळी आणि भाकरी खाऊनही कंटाळा येतोच. याच गहू आणि ज्वारी यांपासून काही नवीन करता आले तर...? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत ज्वारीचा पिझ्झा...
................... 
मुलांना पदार्थांच्या नावाचे खूप आकर्षण असते. त्यामुळे रोजचेच पदार्थ जरा नवीन नावाने त्यांच्यासमोर सादर केले, तर ते कदाचित आवडीने खातात. असाच काहीसा आजचा हा पदार्थ आहे. अगदी रोजचेच पदार्थ वापरून काहीतरी नवीन बनवलं आहे आणि त्याला दिलेलं नाव तर मुलांच्या अगदीच आवडीचं आहे. ज्वारीचा पिझ्झा.. हा एक चटपटीत पदार्थ आहे. मुलांना नक्कीच आवडेल.   

साहित्य : 
ज्वारीचे पीठ – एक वाटी, गव्हाचे पीठ – दोन चमचे, मीठ आणि साखर – चवीनुसार, बेकिंग पावडर आणि सोडा – पाव चमचा, पिझ्झा सॉस, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, उकडलेला बटाटा – प्रत्येकी एक, किसलेला टोफू, लोणी.

कृती : 
- सर्वप्रथम गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ एकत्र करून घेऊन, त्यात थोडे मोहन घालून घ्यावे. 
- या मिश्रणात मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि सोडा घालून ते एकत्रित करून छान कणकीसारखे मळून घ्यावे. 
- त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊन, छोट्या पुऱ्या लाटून घ्या. 
- त्या लाटलेल्या पुरीला बारीक काट्याने टोचे देऊन ती पोळीसारखी भाजून घ्या. 
- नंतर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्या. 
- ते एकत्र करून त्यात थोडेसे लोणी, किसलेला टोफू आणि पिझ्झा सॉस घाला. 
- आता एका तव्यावर थोडेसे बटर घालून हे मिश्रण छान परतून घ्या. 
- तयार केलेल्या छोट्या पुरीवर हे परतलेले मिश्रण घालून, त्यावर थोडा सॉस घालून ते सर्व्ह करा. 
 
- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link