Next
‘रंग दे महाराष्ट्र’ मोहिमेची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, March 30, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोमुंबई : सामाजिक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करून सामाजिक विकासाच्या मूलभूत पातळीपर्यंत काम करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेण्याच्या आपल्या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) या संघटनेने आंतरराष्ट्रीय रंग दिनानिमित्त ‘रंग दे महाराष्ट्र’ (#RangDeMaharashtra) मोहिमेचे आयोजन केले आहे.

या मोहिमेसाठी संघटनेने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि टाटा ट्रस्ट्स यांच्याशी भागीदारी केल्याचेही घोषित केले. दरवर्षी २१ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय रंग दिन साजरा केला जात असून, भारतात यंदा प्रथमच हा दिन साजरा केला जात आहे.

राज्यातील एक हजार गावे क्रांतीकारी पद्धतीने सुधारण्याच्या महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनच्या (एमव्हीएसटीएफ) ध्येयाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार आणि कॉर्पोरेट भारताचे एकत्रित विकासात्मक प्रयत्न जगासमोर आणणे ही यामागची मूळ कल्पना आहे.

‘रंग दे महाराष्ट्र’ हा उपक्रम राज्यभर सुरू झाला असून, यात राज्यातल्या ३५० शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायती रंगवण्यात येणार आहेत. अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, रायगड आणि नंदूरबार या ११ जिल्ह्यांतील १२० ग्रामपंचायती या प्रकल्पात सहभागी होणार आहेत. समाजविकास आणि ग्रामीण उपक्रमातील सुत्रबद्धता साधणे हे या उपक्रमामागचे ध्येय आहे. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि पोषणाहार, लिंग समानता या मुख्य सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून उपक्रमाबाबत जागरुकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, ग्रामीण भागातील भिंतींवर समाजविकासासाठी सामाजिक संदेश रंगवून त्यांचे रूपडे पालटण्याचा एमव्हीएसटीएफ आणि नेरोलॅक पेंट्सचा मानस आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सामाजिक विषयांवर जनजागृती पसरविण्याच्या हेतूने ‘रंग दे महाराष्ट्र’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण उत्साहात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सोशल व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन या संघटनेशी भागीदारी केल्याबद्दल कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि टाटा ट्रस्ट्सचे मी अभिनंदन करतो. यामुळे शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींच्या इमारती केवळ रंगीत होणार नाहीत, तर या उपक्रमातल्या चांगल्या समाजसहभागातून अधिक जागरुकता निर्माण होईल, अधिक चांगली शिक्षण व्यवस्था जन्माला येईल आणि गावाबद्दलची मालकी भावना लोकांमध्ये निर्माण होईल. ही मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी मी शुभेच्छा देतो.’

‘नेरोलॅक’च्या विपणन विभागाचे महाव्यवस्थापक पियुष बचलाऊस म्हणाले, ‘दृश्यात्मक व सामाजिक बदल घडवून आणण्यात रंगांचा मोठा वाटा असतो, असा ‘नेरोलॅक पेंट्स’चा विश्वास आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातल्या गावांमध्ये बदल घडवून आणण्याच्या ‘एमव्हीएसटीएफ’च्या मोहिमेत त्यांच्यासह काम करताना आम्हाला आनंद होतो आहे.’

आपला दृष्टिकोन मांडताना ‘एमव्हीएसटीएफ’चे सीईओ रामनाथ सुब्रमण्यम म्हणाले, ‘अशाप्रकारच्या समाजोपयोगी आणि कल्पक कामासाठी आमच्याशी भागीदारी केल्याबद्दल मी प्रथम ‘कन्साई नेरोलॅक’चे आभार मानतो. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या भागीदाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे.’

टाटा ट्रस्ट्सच्या विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख अभिषेक पोडुरी म्हणाले, ‘टाटा ट्रस्ट्सच्या प्रत्येक कार्यात समाज हा केंद्रस्थानी असतो. कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे समाजसहभागातून केलेले एखादे कार्य होय, असा आमचा ठाम विश्वास आहे. ‘रंग दे महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या माध्यमातून न्यासाची मूलतत्वे असलेला सामाजिक सलोखा, एकजूट आणि विकास ही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link