Next
प्रा. अनिल घोलप यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 02:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रा. अनिल त्रिंबक घोलप यांना अर्थशास्त्र विषयातील पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

प्रा. घोलप यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ ट्रायबल एज्युकेशन प्रमोशनल स्कीम्स ऑन सोशियो-इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल पीपल इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू ठाणे डिस्ट्रिक्ट (२००१-२०१०)’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना नाशिक येथील दिंडोरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील उगले यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. अनिल घोलपप्रा. घोलप यांनी त्यांच्या संशोधनामध्ये आदिवासी शिक्षण योजना आदिवासी लोकांकरिता कशा प्रकारे उपयुक्त ठरत असून, त्याद्वारे आदिवासी लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कशाप्रकारे भर पडली हे अधोरेखित केले आहे; तसेच आदिवासी शिक्षण योजनांचा लाभ घेताना आदिवासी लोकांना येणाऱ्या अडचणी व योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाला येणाऱ्या अडचणी यांचा विस्तृत अभ्यास करून त्यावर उपाययोजना ही सुचविल्या आहेत.

प्रा. घोलप हे सध्या सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डी. डी. पुजारी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गौतम दळवी तसेच सहकारी प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link