Next
‘होंडा’च्या चार मॉडेल्समध्ये ‘एबीएस’, ‘सीबीएस’चा समावेश
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 02:36 PM
15 0 0
Share this story

२०१९ सीबी शाइन सीबीएस

नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने १५०सीसी श्रेणीतील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सीबी युनिकॉर्नमध्ये अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीमचा (एबीएस) समावेश केला असून, सीबी शाइन (ड्रम प्रकार), सीडी ड्रीम डीएक्स व नवी या मॉडेलमध्ये इक्विलायझरसह कॉम्बी ब्रेक सिस्टीमचा समावेश केला आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेत, २००९मध्ये, आपल्या टू-व्हीलर्समध्ये पहिल्यांदा इक्विलायझरसह कॉम्बी ब्रेक सिस्टीमचा समावेश करणारी ‘होंडा’ ही पहिली कंपनी होती. गुणवत्ता, आरामदायीपणा व दर्जा यांची अचूक सांगड असणारी होंडा सीबी युनिकॉर्न लाखो ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘२०१९ सीबी युनिकॉर्न एबीएस’मध्ये सोय व टिकापणा या दृष्टीने ट्युबलेस टायर्स, ब्ल्यू इल्युमिनेशन असणारे आकर्षक मीटर कन्सोल आणि सील चेन आहे. या गाडीची किंमत ७८ हजार ८१५ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

२०१९ सीबी युनिकॉर्न एबीएस

सीबी शाइनचे ७० लाखांहून अधिक समाधानी ग्राहक असून, ‘२०१९ सीबी शाइन’मध्ये आता इक्विलायझरसह कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टीमचा समावेश केला आहे. या गाडीची किंमत ५८ हजार ३३८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. १००-१०० सीसी श्रेणीतील ‘होंडा’च्या सीडी ११० ड्रीममध्ये इक्विलायझरसह कॉम्बी ब्रेक सिस्टीम समाविष्ट आहे. प्रगत ब्रेकिंग सिस्टीमबरोबरच, या मोटरसायकलमध्ये आता सिल्व्हर फाइव्ह अलॉय व्हील्स, क्रोम हँडल बार व कॅरिअर, पेंटेड – फ्रंट फेंडर, काउल व टेल काउल, स्पष्ट विंकर्स व ग्राफिक्स यांचा समावेश आहे. ‘२०१९ सीडी ११० सीबीएस’ची किंमत ५० हजारांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

२०१९ सीडी ११० सीबीएस

नवी या होंडा आरअँडडी इंडियाची स्थानिक निर्मिती असणाऱ्या पहिल्या टू-व्हीलरमध्ये आता इक्विलायझरसह कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टीम समाविष्ट आहे. सीबीएसमध्ये सहज ब्रेक लावता येतील व त्यामुळे शॉर्टर ब्रेकिंग डिस्टन्स असेल व चांगला समतोल साधता येईल. या गाडीची ची किंमत ४७ हजार ११० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

होंडा नवी सीबीएस
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link