Next
पोटावरील चरबी हे हृदयरोगामागील महत्त्वाचे कारण
‘सफोला लाइफ’च्या अभ्यासातील निरीक्षण
प्रेस रिलीज
Tuesday, October 02, 2018 | 11:25 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून सफोला लाइफतर्फे भारतात हृदयाच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अभ्यास सादर केला. पोटावर चरबी असलेल्या ६७ टक्के भारतीयांना हृदयरोगाचा धोका संभवत असल्याचे ‘सफोला लाइफ स्टडी २०१८’मध्ये निदर्शनास आले. या अभ्यासामध्ये पोटावरील चरबी आणि त्याचा हृदयावर होणारा परिणाम यांसाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला.

भारतात जीवनशैलींच्या वाढत्या आव्हानांमुळे आता अगदी तरुण वयातच हृदयरोगाचा धोका जाणवू लागला आहे. यामागे कामाचे अतिरिक्त तास, नोकरीतील तणाव, अनियमित खाणे, झोपेचा अभाव आणि बैठी जीवनशैली अशी कारणे आहेत. यांमुळे हृदयरोग, लठ्ठपणा व मधुमेह असे जीवनशैलीविषयक आजार वाढू लागले आहेत.

लठ्ठपणा ओळखण्यासाठी बीएमआय हे सर्वात संशोधित परिमाण आहे. चरबीचे विभागणे किंवा मध्यभागी असलेला लठ्ठपणा ज्याला सामान्यपणे पोटावरील चरबी म्हणून ओळखले जाते हे हृदयरोगामागील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पोटावरील चरबीविषयी लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आढळून आला. लोकांकडून याकडे केवळ सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते; मात्र हृदयासाठी हानीकारक म्हणून पाहिले जात नाही. म्हणूनच याबाबतीत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘सफोला लाइफ स्टडी २०१८’ने ‘हृदयाच्या आरोग्यावर पोटावरील चरबीचा परिणाम’ यावर प्रकाश टाकला. या सर्वेक्षणातून हे लक्षात आले की, बारीक शरीरयष्टी असूनही पोटाचा घेर वाढलेला असेल, तर त्याला हृदयरोगाचा धोका संभवू शकतो.

पोटावर चरबी असलेल्या ६७ टक्के भारतीयांना हृदयरोगाचा धोका असतो; पण तरीही पोटावर चरबी असणारे ८४ टक्के भारतीय हृदयरोगासाठी सर्वाधिक तीन कारणांपैकी एक कारण पोटावर असलेली चरबी असू शकते, असे मानत नाहीत. पोटावर चरबी असणाऱ्या भारतीयांमधील खाण्याच्या सवयी जाणून घेतल्या असता, आठवड्यातून एकदा घराबाहेर खाणारे (८१ टक्के), रात्रीचे जेवण अधिक घेणारे (७८ टक्के), आणि जंक फूडचे सेवन (६९ टक्के) करणारे होते. पोटावर चरबी असणाऱ्यांमध्ये जीवनशैलीविषयक सवयी म्हणजेच शांत झोप न येणे (५८ टक्के) आणि नियमितपणे व्यायाम न करणे या सामान्यपणे सारख्याच होत्या.

अभ्यासामध्ये आढळून आलेल्या तथ्यांबाबत बोलताना लिलावती हॉस्पिटलचे एन्डोक्रायनॉलॉजिस्ट पद्मश्री डॉ. शशांक जोशी म्हणाले, ‘अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, पोटावर चरबी असलेल्या ६७ टक्के भारतीयांना हृदयरोगाचा धोका संभवतो आणि या जागतिक हृदयरोग दिनी आम्ही प्रत्येक व्यक्तीला हे सूचित करू इच्छितो की, त्यांचा पोटाचा घेर मोठा असेल, तर त्यांनाही हृदयरोगाचा धोका असू शकतो; तसेच त्यांनी हेही समजून घेतले पाहिजे की, तुमचा बीएमआय सामान्य असेल आणि तुमच्या पोटाचा घेर मोठा असेल, तरीही तुम्हाला हृदयरोगाचा धोका संभवू शकतो. यातील परस्परसंबंधाबाबत जागरुक असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरुन तुम्ही हृदयाच्या आरोग्याबाबत सक्रिय पावले उचलू शकाल.’

स्‍वस्‍थ हृदयासाठी योग्‍य जीवनशैलीबाबत बोलताना पोषणतज्ज्ञ पूजा मखिजा म्‍हणाल्‍या, ‘या जागतिक हृदयदिनी ‘सफोला लाइफ स्‍टडी’ने दर्शवल्‍याप्रमाणे, पोटावरील चरबी आणि हृदयाच्‍या आरोग्‍याचा धोका यांचा परस्‍परसंबंध असतो. त्‍यामुळे, पोटावरील चरबी कमी करणे महत्त्वपूर्ण आहे. म्‍हणूनच, मी आवाहन करते की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीने त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये छोटे-छोटे, पण महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे आहे, जेणेकरून ते पोटावरील चरबीची समस्‍या दूर करू शकतील. हे योग्‍य आहार, जंक फूडचे सेवन टाळणे, नियमितपणे व्‍यायाम, योग्‍य झोप व तणाव कमी करण्‍याने सहजपणे साध्‍य होऊ शकते. तुमच्‍या हृदयाची काळजी घ्‍या, उच्‍च-फायबरयुक्‍त आहार घ्‍या, भरपूर चाला आणि शरीराला आवश्‍यक झोप द्या.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search