Next
‘कॉप शॉप उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी  अटल महापणन विकास अभियानांतर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला असून, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगट यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,’ असे आवाहन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

शहरी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप उपक्रमास गती देण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित  करण्यात आली होती. त्या वेळी राज्यातील शहरी भागातील जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्न-धान्य, फळे, भाजीपाला), प्रक्रिया उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.’

‘शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणुकीसाठी सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, त्यांच्या वाहनांना विभागाचे बॅनर लावावे, तसेच कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करावे, ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात नियोजन राहाण्यासाठी ऑनलाइन ॲप विकसित करावे, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि विभागीय किंवा जिल्हास्तरावर स्थायी स्वरूपात कॉप शॉप सुरू करावेत याचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि त्यांच्या संस्थांना शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी होईल,’ असे त्यांनी सांगितले.

अटल महापणन विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या गावातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सद्यस्थितीत ठाणे व मुंबई उपनगर भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कॉप शॉप सुरू केले आहे. त्याला शहरी भागातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, असे कॉप शॉप जास्तीत जास्त ठिकाणी सुरू करण्याची मागणीही होत असल्याची माहिती उपस्थित निबंधकांनी या बैठकीत दिली.

राज्यातील सहकार व पणन विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांनी गृहनिर्माण सोसायट्यांमधील कॉप शॉप योजनेबद्दलची माहिती सादर केली. मुंबईत ६७, ठाणे येथे १३, पुण्यात २०, पनवेल येथे दोन असे कॉप शॉप सुरू झाले  आहेत. सद्यस्थितीत पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, मुरबाड, शहापूर, पुणे, जुन्नर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या भागांतील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायट्यांपर्यत पोहचविण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link