Next
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर
हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी
BOI
Friday, October 04, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पुणे, मुंबई, इंदौर, नागपूर, गोवा, औरंगाबाद आणि अहमदगनर येथील पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये सुरू राहणार आहे. प्युअर हॅपिनेस ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना अविश्वसनीय किंमतीत हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याची संधी या दिवाळीत अनुभवता येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘आधुनिक काळातील महिला हिऱ्यांच्या दागिन्यांना अधिकाधिक पसंती दाखवत आहेत, कारण हे दागिने चमकदार व मनमोहक तर असतातच; तसेच ते कुठल्याही एका प्रसंगासाठी मर्यादित नसून कौटुंबिक सोहळा, ऑफिस आणि पार्टीसाठीदेखील वापरता येतात. त्यामुळेच या प्युअर हॅपिनेस ऑफरद्वारे हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीचा आनंद ग्राहकांना मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासोबत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर असलेल्या सवलतीमुळे हा आनंद द्विगुणित होईल याची आम्हाला खात्री आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search