Next
डॉ. कश्यप यांचा संगीत नजराणा
प्रेस रिलीज
Friday, April 13, 2018 | 06:47 PM
15 0 0
Share this story

कार्यक्रमात गाणी सादर करताना डॉ. माधुरी कश्यप आणि सहकारीपुणे : आघाडीच्या प्रसिद्ध महिला प्रसुतीतज्ज्ञ आणि दु्र्बिणीतून शस्त्रक्रिया करणार्‍या शल्यविशारद डॉ. माधुरी कश्यप यांनी आपल्या संगीतावरील प्रेमासाठी नवोदित गायक-गायिकासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उभारले आहे. म्युझिक क्राफ्ट एंटरटेनमेंट या शीर्षकाखाली त्यांनी ‘आपको लुभाने मस्तीभरे दो गाने’ या नावाचा एक संगीतमय कार्यक्रम नुकताच सादर केला.

एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. कश्यप यांची असून, त्यांच्यासह या संगीत मैफिलीत हिंदी चित्रपटांमधील एकंदर २६ गाणी सादर करण्यात आली. रसिक व ज्येष्ठ नागरिक यांनी तुडुंब भरलेल्या या सभागृहात उपस्थित या गाण्यांच्या सादरीकरणामुळे मंत्रमुग्ध झाले. गायकांमध्ये डॉ. कश्यप यांच्यासह हर्षवर्धन भुसारी, शैलेश मोहीकर, डॉ. दिलीप काळे, अनुश्री घोरपडे, दीप्ती चंदन, दीपा गाडगीळ आदींचा  समावेश होता. डॉ. अश्‍विनी दामले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

१९५० ते ८०च्या दशकांमधील लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘पाच रुपैया बारा आना’, ‘आज रपट जाए’, ‘पहले पहले प्यार की मुलाकाते’, ‘अपलम चपलम’, ‘कह दू तुम्हे’, ‘छोड दो आँचल’ आदी गाण्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे ही गाणी संगीत ट्रॅकवर सादर होताना मागील पडद्यावर मूळ चित्रपटातील गीते त्यात गाणार्‍या अभिनेत्यांच्या ओठांच्या हालचालींना जुळतील, अशा पद्धतीने सादर केली जात होती. त्यामुळे रसिकांना गाण्याच्या आनंदाबरोबर त्या गाण्याच्या कालखंडातील आठवणींमध्ये रमण्याचा आनंदही घेता आला.

या वेळी डॉ. कश्यप म्हणाल्या की, ‘यापूर्वी मी आतापर्यंत अनेक व्यावसायिक संचांबरोबर ऑर्किस्ट्रांमध्ये गायले आहे. त्यामध्ये अंध शाळा, सिप्ला परिहार केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह, मुंबईतील आर्थर रोड कारागृह आणि खडकीतील अपंगत्व आलेल्या सैनिकांपुढेही गाणी सादर केली आहेत.’

‘गाणे ही केवळ माझी हौस नाही, तर त्यासाठी मला पुरेसा वेळ द्यावा, असे मनापासून वाटते. गाण्याची इच्छा अनेकांना असते; पण त्यासाठी त्यांना व्यासपीठ नसते, ते देण्यासाठी मी धडपड केली आहे. यासाठी स्वत:चा नवोदित गायकांसाठीचा संच मी स्थापन केला असून, आतापर्यंत झालेल्या तीन कार्यक्रमांना रसिकांची भरघोस दाद मिळत आहे. हे सारे गायक आपल्या नोकरी-व्यवसायातून वेळ काढून तितक्याच उत्साहाने यात सहभागी होत आहेत, याचा आनंद खूप मोठा आहे. हे कार्यक्रम रसिकांसाठी आम्ही मोफत ठेवले आहेत,’ असेही डॉ. कश्यप म्हणाल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link