Next
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ‘एज्युकेअर’च्या विद्यार्थ्यांचे यश
BOI
Monday, February 04, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रोअॅक्टिव्ह अबॅकस या राष्ट्रीय कंपनीतर्फे राष्ट्रीय पातळीवरची विभागीय स्तरावरची स्पर्धा चिपळूण येथे आयोजित केली होती. यात रत्नागिरीतील एज्युकेअर फाउंडेशनच्या एज्युकेयर प्रोअॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध गटांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मिळवताना इतर नऊ विद्यार्थ्यांनी चांगली रँक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.

‘अ’ गटात प्रथम आलेल्या स्पंदन लिंगायत याने सहा मिनिटांत १०० गणिते सोडविली. ती सर्वच बरोबर होती. या स्पर्धेत रत्नागिरी विभागातून विविध सेंटरच्या सुमारे ३२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.  

‘एज्युकेअर’चे यश मिळवलेले विद्यार्थी असे : स्पंदन संकेत लिंगायत (पहिली, फाटक हायस्कूल, अ गट- प्रथम क्रमांक), अर्णव अमेय भिसे (दुसरी, शिर्के हायस्कूल, ब गट- द्वितीय क्रमांक), माही स्वप्नील सावंत (तिसरी, पटवर्धन हायस्कूल, क गट- द्वितीय), स्पर्श संकेत लिंगायत (पहिली, फाटक हायस्कूल, अ गट- तृतीय). या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावत सुयश संपादन केले.

ओजल कुणाल मलुष्टे (पहिली, जीजीपीएस), मोहित धनंजय टिकेकर (दुसरी, फाटक हायस्कूल), पूर्वा अभ्यंकर (दुसरी, फाटक हायस्कूल), नंदिनी मनोज हळदणकर (दुसरी, पटवर्धन हायस्कूल), मल्हार ओमकार बापट (तिसरी, फाटक हायस्कूल), स्वरा नीलेश वैद्य (तिसरी, पटवर्धन हायस्कूल), वेदांत वैद्य (चौथी, पटवर्धन हायस्कूल), विपुल भूषण मुळ्ये (पाचवी, पोद्दार हायस्कूल), आर्यन मयेकर (सहावी, पोद्दार हायस्कूल) आदी विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह अनुक्रमे अ, ब, क गटांमध्ये सुवर्णपदक मिळविले.

या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना एज्युकेअर प्रोअॅक्टिव्ह अबॅकसच्या संचालक सोनल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्रोअॅक्टिव्ह अबॅकस कंपनीचे संचालक अध्यक्ष गिरीश करडे, संचालक अजय मणियार, एज्युकेयर फाउंडेशनचे संचालक स्वप्नील सावंत तसेच सेंटरला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

गणिताच्या माध्यमातून अंकगणितातील कौशल्य विकसित करण्यासाठी अबॅकस तंत्राचा वापर केला जातो. मुलांची गणितातील भीती निघून जावी म्हणून अबॅकस शिकवले जाते. यामुळे विद्यार्थी अंकगणितात हुशार होतात, त्यांची स्मरणशक्तीत व एकाग्रतेत वाढ होते, आत्मविश्वास वाढतो, वैचारिक व बौद्धिक क्षमतेचा विकास होतो.

रत्नागिरीमध्ये टिळकआळी परिसरात नोव्हेंबर २०१७ मध्ये एज्युकेयर प्रोअॅक्टिव्ह अबॅकस सेंटरची सुरवात झाली. याला विविध शाळांतील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अल्पावधीतच एज्युकेअर प्रोअॅक्टिव्ह अबॅकस सेंटरने मुलांना विविध स्पर्धेत उतरवून घवघवीत यश संपादन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link