Next
‘रानडेंचा उद्बोधक जीवन प्रवास उलगडणार’
प्रेस रिलीज
Thursday, November 30 | 05:56 PM
15 0 0
Share this story

एकनाथ रानडेपुणे : ​‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखा व ​वृंदावन फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सचिव एकनाथ रानडे यांच्या जीवनकार्याचा प्रवास दाखविणारा ​‘एकनाथ ​: ​एक जीवन, एक ध्येय’ हा चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. चित्रपटासाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे,’ अशी माहिती विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी दिली.

​विवेकानंद केंद्र​ व फुलपंकीन ​स्टुडिओ यांनी या चित्रपटाची निर्मिती ​​केली असून, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे उपाध्यक्ष बी. निवेदिता हे चित्रपटाचे लेखक, तर ए. सुदर्शन हे दिग्दर्शक आहेत.

सामान्य माणसांकडून एक-एक रुपया गोळा करून स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असले​ले विवेकानंद शीला स्मारक आणि सामान्य माणसांची असामान्य संघटन असलेली विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संघट​नेची स्थापना ​ज्यांनी केले ते एकनाथ रानडे यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट आहे. अनेक अडथळ्यातून केलेल्या कन्याकुमारी येथील शिलास्मारक बांधणीतील योगदान, घेतलेले परिश्रम असा उद्बोधक जीवन प्रवास या माध्यमातून पहायला मिळणार आहे.

चित्रपटाविषयी :

दिवस : रविवार, तीन डिसेंबर २०१७
स्थळ : आयनॉक्स सिनेमाघर, विधानभवनासमोर, बंड गार्डन रोड, पुणे.
 
प्रवेशिकेसाठी संपर्क : विवेकानंद केंद्र २१, निष्ठा, सदाशिव पेठ. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, अश्‍विनी हाईटस्, ग्राहक पेठ, टिळक रोड.
वेळ : सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link