Next
अंबर्जे गावासाठी दीड कोटीची पाणी योजना मंजूर
मिलिंद जाधव
Saturday, September 08, 2018 | 04:52 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील अंबर्जे ग्रामपंचायतीसाठी एक कोटी ४८ लाख रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत कमिटीने आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

अंबर्जे ग्रामपंचायतीमध्ये १९८४ साली मंजूर झालेली पाणी योजना अत्यंत जीर्ण झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक वेळा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. २०१७मध्ये नवीन पाणी योजना मंजूर करण्याचे आश्वासन देणाऱ्या ग्राम विकास पॅनलला अंबर्जे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची सत्ता दिली होती. ही योजना मंजूर होण्यासाठी पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र परटोले यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध ठिकाणी पत्रव्यवहार करून आमदार पांडुरंग बरोरा यांच्याकडे ही योजना मंजूर करण्यासाठी आग्रह धरला. कागदपत्रांची योग्य वेळी केलेली पूर्तता आणि आमदार पांडुरंग बरोरा यांचा पाठपुरावा यामुळे या गावाला सुमारे दीड कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या योजनेचा पाठपुरावा करणारे आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन सरपंच पांडुरंग मुकणे, उपसरपंच हर्षला गोतरने, पाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र परटोले, माजी सरपंच कृष्णा परटोले, ग्रामपंचायत सदस्य मीराबाई परटोले, किरण परटोले, सुरेखा जाधव आदींनी  त्यांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search