Next
‘आयसीआयसीआय’ची ‘मँचेस्टर युनायटेड’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, September 01, 2018 | 03:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने क्लबच्या ३५ दशलक्ष भारतीय चाहत्यांसाठी विविध प्रकारची स्पर्धात्मक को-ब्रँडेड क्रेडीट व डेबिट कार्डे उपलब्ध करण्यासाठी मँचेस्टर युनायटेडबरोबर विविध वर्षांची भागीदारी केली आहे.  

कराराचा भाग म्हणून, आयसीआयसीआय बँक मँचेस्टर युनायटेडच्या भारतीय चाहत्यांना ‘मँचेस्टर युनायटेड प्लॅटिनम क्रेडिट कार्ड बाय आयसीआयसीआय बँक’ आणि ‘मँचेस्टर युनायटेड सिग्नेचर क्रेडिट कार्ड बाय आयसीआयसीआय बँक’ ही दोन प्रकारची क्रेडिट कार्डे देणार आहे. प्रत्येक कार्ड मँचेस्टर युनायटेड ऑनलाइन स्टोअर व भारतातील अन्य संलग्न भागीदारींकडे उपलब्ध असलेल्या मर्चंडाइजवर विशेष लाभ व सवलती देणार आहे. वार्षिक कॅम्पेनच्या आघाडीच्या स्पेंडर्ससाठी पूर्णतः पेड असलेली खेळ पाहण्यासाठी इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडीयम ट्रिप, टीमचे पहिले प्रशिक्षण सत्र पाहण्याची संधी, प्रत्येक नव्या ग्राहकाला साइन्ड मर्चंडाइज व मँचेस्टर युनायटेडकडून वेलकम गिफ्ट यांचा लाभांमध्ये समावेश आहे.

आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘बँकेची विविध क्रेडिट व डेबिट कार्ड दाखल करण्यासाठी, मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश प्रीमिअर लीग फूटबॉल क्लबशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. ग्राहकांना नाविन्यपूर्ण, प्रभावी व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयत्न या सहयोगामुळे अधोरेखित होणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण फूटबॉल क्लबच्या देशातील चाहत्यांना उत्तम सेवा देण्यासाठी, ही को-ब्रँडेड कार्डे म्हणजे आणखी एक प्रभावी साधन आहे. ही कार्डे दाखल केल्याने, ग्राहकांना जागतिक दर्जाचे लाभ देण्यासाठी आम्ही जपत असलेली बांधिलकी पुन्हा समोर येणार आहे. आमच्या सध्याच्या क्रेडिट व डेबिट कार्डांमध्ये, या कार्डाच्या रूपाने आणखी एका उत्कृष्ट उत्पादनाचा समावेश होणार आहे.’

मँचेस्टर युनायटेड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रिचर्ड अर्नोल्ड म्हणाले, ‘गेल्या काही हंगामांमध्ये क्लबने भारताला अनेकदा भेट दिली आहे. जानेवारीमध्ये मुंबईत आयोजित केलेल्या #ILOVEUNITED फॅन इव्हेंटमध्ये, लाइव्ह सामन्यांच्या स्क्रीनिंगला जवळजवळ पाच हजार चाहत्यांनी हजेरी लावली. आयसीआयसीआय बँकेबरोबरच्या आमच्या भागीदारीमुळे, आम्हाला या एकनिष्ठ चाहत्यांना भारतातील एका प्रतिष्ठित बँकिंग समूहाकडून दर्जेदार वित्तीय सेवा देता असताना, त्यांना यापुढेही सहभागी करून घेता येईल व त्यांच्याशी संवाद साधता येईल.’

मँचेस्टर युनायटेडप्रेमी क्रेडिट कार्डासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्यांना बँकेच्या कस्टमर केअर अधिकाऱ्यांकडून कॉल केला जाईल. आयसीआयसीआय बँकेतर्फे मँचेस्टर युनायटेड रेंज डेबिट कार्ड लवकरच उपलब्ध होतील.

‘आयसीआयसीआय बँकेतर्फे मँचेस्टर युनायटेड क्रेडिट कार्डांचे फायदे या प्रमाणे आहेत- वार्षिक कॅम्पेनच्या टॉप १८ स्पेंडरना ओल्ड ट्रॅफोर्ड सामन्यासाठी पूर्णतः पेड ट्रिप दिली जाईल, टीमने सही केलेले मँचेस्टर युनायटेड जर्सी दिली जाईल व खेळाच्या वेळी आदरातिथ्य केले जाईल. वार्षिक कॅम्पेनच्या टॉप १८ स्पेंडरना स्टेडीयम व म्युझिअमची खासगी टूर करण्याची, टीमच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचा भाग पाहण्याची व स्टेडीयममध्ये मँचेस्टर युनायटेड मेगास्टोअरला भेट देण्याची संधी मिळेल.

वार्षिक कॅम्पेनच्या टॉप ७० स्पेंडरना मँचेस्टर युनायटेड ब्रँडेड मर्चंडाइज दिले जाईल. टॉप स्पेंडरना दर महिन्याला साइन्ड मँचेस्टर युनायटेड जर्सी व मँचेस्टर युनायटेड टीमच्या सामन्याचे तिकीट मिळेल. मँचेस्टर युनायटेड ऑनलाइन स्टोअर व भारतातील सहयोगी भागीदारांकडून मर्चंडाइजवर १० ते २० टक्के सवलत मिळेल. प्रत्येक क्रेडिट कार्डावर ब्रँडेड एमयू मर्चंडाइजचे वेलकम गिफ्ट. वेलकम गिफ्टमध्ये एमयू ब्रँडेड फूटबॉल, होल्डऑल आदींचा समावेश असेल.

क्रेडिट कार्डासाठी अर्ज करण्यासाठी : ७४३४ ०० ५५५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या अथवा ५६७६७६६ क्रमांकावर SMS MU असा एसएमएस पाठवावा. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search