Next
एल अँड टी इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज १
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 02:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘एल अँड टी’ म्युच्युअल फंडाच्या ‘एल अँड टी इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड - सिरीज १’चे २९ जानेवारी उद्घाटन झाले. वाटपापासून ११५१ दिवसांच्या मुदतीसह ही क्लोज एंडेड स्कीम आहे. न्यू फंड ऑफर (एनएफओ) २९ जानेवारी पासून सुरू होत असून, १२ फेब्रुवारी पर्यंत चालेल. अधिक विस्तारित बाजारपेठांसाठी महसूलातील वाढ आणि उच्चतम दरांचे लाभ मिळवण्याची क्षमता असलेल्या लहान कॅप कंपन्यांच्या विविध श्रेणींतून दीर्घकाळचे भांडवली अॅप्रिसिएशन निर्माण व्हावे, असे या फंडाचे ध्येय आहे.

एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे प्रमुख कार्यकारी ऑफिसर कैलास कुलकर्णी म्हणाले, ‘एल अँड टी इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंडाच्या उद्घाटनामुळे, त्यांच्या पोर्टफोलिओसाठी विशेष वैविध्यपूर्णतेसह अधोमूल्य प्रकारातील बाजारपेठेत गुंतवणूक करून, लाभ मिळवण्याची संधी आम्ही गुंतवणूकदारांना देत आहोत. लहान कॅप स्टॉक्स खर्चिक मूल्यांचे ट्रेडिंग करत असल्याचा एखाद्याचा विश्वास असला, तरी योग्य दरातील मूल्यांकनाचे असंख्य स्टॉक्स उपलब्ध आहेत. एक सक्षम नेतृत्व, उत्तम प्रशासन आणि गुंतवणूकदारांना योग्य तो मोबदला देईल अशी संतुलित शीट स्ट्रेंग्थ अशा प्रमाणित संधींभोवतीच व्यवसायाची उभारणी होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

एल अँड टी इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंडाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, हा फंड एस अँड पी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स असेल. फंड आपली ६५ टक्के निव्वळ मालमत्ता इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित स्मॉल कॅप कंपन्यांच्या सिक्युरिटीज यांच्यात गुंतवेल. तसेच स्मॉल कॅप कंपन्यांशिवाय इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित निव्वळ मालमत्तांमध्ये ३५ टक्के गुंतवणूक केली जाऊ शकते आणि कर्ज आणि मनी मार्केट गुंतवणुकीत २० टक्के निव्वळ मालमत्तांपर्यंतही गुंतवणूक केली जाऊ शकते. यापैकी प्रति अर्जाची कमीत कमी रक्कम पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत वाढणारी आहे.

एल अँड टी म्युच्युअल फंडात आम्ही खासगी मालकीची गुंतवणूक प्रक्रिया राबवतो आहे, ज्याला जी.ई.एम म्हणतात, आणि याद्वारे संकल्पना राबवणे, व्यवसायाचे / कंपन्यांचे गुणांकन आणि उत्पादन आणि पोर्टफोलिओचे नियंत्रण असे तीन टप्पे गाठता येतात. आमची संशोधन टीम स्वतः समर्थपणे कार्यरत आहे आणि गुंतवणुकीच्या संकल्पनांचे गुणांकन करत आहे, तसेच आमचे अनुभवी फंड मॅनेजर निवडक गुंतवणुकीच्या संकल्पनांचा या स्कीममध्ये वापर करतात, या संकल्पना फंडातील अत्यावश्यक गोष्टींवर आधारित असतात.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link