Next
पोटे, आंबटकर, धस यांचे अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 05:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर व बीड–लातूर–उस्मानाबाद मतदारसंघात माजी मंत्री सुरेश धस यांनी अर्ज दाखल केले.

उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी अमरावती येथे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, माजी आमदार अरुण अडसड, अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, अमरावती शहराध्यक्ष जयंत डेहणकर व महिला मोर्चा शहराध्यक्ष रिताताई मोकलकर उपस्थित होते.

डॉ. रामदास आंबटकर यांनी चंद्रपूर येथे गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल केला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराजे अत्राम, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष आमदार नाना शामकुळे, आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, पंकज भोयर, संजय धोटे, समीर कुणावार, कृष्णा गजबे व देवराव होळी उपस्थित होते.

माजी मंत्री सुरेश धस यांनी उस्मानाबाद येथे गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल केला. या वेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, आमदार आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, सुधाकर भालेराव, विनायक पाटील व संगीता ठोंबरे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे व राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link