Next
आंतरराष्ट्रीय गायनॉकॉलॉजिकल एंडोस्कोपी परिषदेचे आयोजन
BOI
Saturday, September 01, 2018 | 04:52 PM
15 0 0
Share this article:

डॉ. सुनिता तांदुळवाडकर
पुणे : ‘‘इंटरनॅशल सोसायटी फॉर गायनॉकॉलॉजिक एंडोस्कोपी’तर्फे (आयएसजीई) ‘इंडियन असोसिएशन ऑफ गायनॉकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट’सह (आयएजीई) जे. डब्ल्यू मॅरिएट येथे सहा ते नऊ सप्टेंबर या कालावधीत गायनॉकॉलॉजिकल एंडोस्कोपी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद स्टार, म्हणजेच स्पेसेस, टेक्निक्स, अडव्हान्सेस आणि रिसर्च, या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेनुसार, सुयोग्य उपचारपद्धती आणि रुग्णाला आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या शुल्कातील परिणाम यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा करण्यात येईल’, असे ‘स्टार २०१८’ च्या आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांनी सांगितले. 

त्या पुढे म्हणाल्या, ‘या परिषदेत तब्बल २२ देशांमधून उच्चपदस्थ स्त्री रोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक आणि अन्य वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या अनोख्या व्यासपीठामुळे अनेकजण एकमेकांशी जोडले जाणार आहेत, हे निश्चित. या व्यासपीठावरून स्त्री रोगशास्त्रातील अत्याधुनिक ज्ञानाचीही देवाण-घेवाण केली जाणार आहे. हा उपक्रम जलद अध्ययनाला चालना देईल. यामुळे फिजिशिअन्सना अधिक परिणामकारक उपचार करता येतील.’ 

‘योनी शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टोमी, आवाळूसंदर्भातील गैरसमज आणि चर्चेतील निष्पत्ती, ओव्ह्युलेशन इंडक्शन, आययूआय, एआरटी- जननक्षमतेमधील अत्याधुनिकतेचा पाया, एंडोमेस्ट्रोसिस व्यवस्थापनातील कला आणि विज्ञानाची गुंतवणूक, ऑफिस हिस्टेरेक्टोमीवरील सखोल उपचार यामधील फिजिशिअन्सचे कौशल्य सुधारणे यासाठी कार्यशाळा घेतल्या जातील. याबरोबरच या उपक्रमात कलर डॉपलर तपासणीवरील कार्यशाळा, युरोगायनॉकॉलॉजी आणि अन्य ४० प्रत्यक्ष एंडोस्कोपिक शल्यचिकित्सा यांचा समावेश असेल. यातील प्रत्यक्ष शल्यचिकित्सा बेंगळूरू आणि पुणे येथून केल्या जातील. उपस्थित तज्ज्ञ विनामूल्य विविध संशोधन पेपरही सादर करतील’,असेही त्यांनी सांगितले. 

‘ज्ञानाची देवाण-घेवाण करणे आणि अत्याधुनिक क्लिनिकल अनुभव, प्रॅक्टिस आणि गायनॉकॉलॉजिक एंडोस्कोपीशी संबंधित तंत्रज्ञान, गुंतागुंतीची प्रकरणे सुलभता आणि सुरक्षिततेने हाताळण्यासाठी उत्कृष्ट कौशल्ये मिळवण्यास प्रोत्साहन देणे या मुद्द्यांवर या परिषदेत भर दिला जाणार आहे’,असे आयएजीईच्या अध्यक्षा डॉ. रिश्मा पै यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search