Next
‘यूएई’तील गुंतवणूकदार करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक संयुक्त अरब अमिरात (यूएई) भेटीच्या तीनच महिन्यांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक प्रस्ताव बैठकांसाठी दुबईला गेले होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान दुबईतील गुंतवणूकदारांनी भारताच्या विद्युत, कृषी, महामार्ग निर्मिती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात ७५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले होते. याचा सर्वाधिक फायदा आता महाराष्ट्राला होणार आहे. फडणवीस यांनी दुबईतील विविध बैठकांदरम्यान राज्याच्या बंदरे, पायाभूत सुविधा आणि झोपडपट्टी विकासासह शहरी गृहनिर्माण या क्षेत्रात भरघोस गुंतवणूक करण्यासंबंधी तेथील महत्त्वाच्या निर्णयकर्त्यांशी यशस्वी चर्चा केली आहे.

एक तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत, फडणवीस आणि संयुक्त अरब अमिरातातील भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी ‘यूएई’तील सर्वात मोठी ८५० अब्ज अमेरिकी डॉलरची मालमत्ता असेलली, गुंतवणूक संस्था अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाच्या (Abu Dhabi Investment Authority, ADIA) प्रतिनिधींशी, महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबद्दल चर्चा केली.

याबाबत राजदूत नवदीप सुरी म्हणाले की, ‘अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरण राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ७५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे. यासाठी प्राधिकरणाने मुंबईतील प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांच्याशी भागीदारी करार केला आहे. किफायतशीर गृहनिर्माण प्रकल्पांना केंद्रस्थानी ठेऊन गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासठी एचडीएफसी बँकेकडे एक अब्ज अमेरिकी डॉलरची सर्वात मोठ्या भांडवली गुंतवणुकींपैकी एक गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.’

एमबीएम समूहाचे प्रमुख शेख मोहम्मद बिन मक्तूम बिन जुमा अल मक्तूम यांच्याशी झालेल्या अन्य बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पात राजघराण्याने उभारलेल्या निधीतून गुंतवणूक करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. यापैकी दोन प्रकल्प आहेत, मुंबई नागपूर संपर्क महामार्ग आणि धारावी पुनर्वसन आणि नुतनीकरण प्रकल्प, ज्याद्वारे एक लाख घरांना पाणी आणि गटर जोडण्या देण्यात येणार आहेत; तसेच सर्व उत्पादन आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना त्यात सामावून घेतले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २५ हजार कोटी रुपये आहे.

डी पी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना, महाराष्ट्र सरकारसोबत नागपूर येथे, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून बनत असलेल्या वाहतूक कॉरीडोर दरम्यान लॉजिस्टीक हब आणि वर्धा, जालना नाशिक आणि सांगली येथे ड्राय पोर्ट विकसित करण्याच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन डी पी वर्ल्डने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र सरकारच्या लॉजिस्टीक पार्क विकसित करण्यासाठीच्या ‘एसपीव्ही’मध्ये ‘एंडीआयए’ निधीतून गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली.

या लॉजिस्टीक पार्कमुळे देशातील सर्वात व्यस्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे कंटेनरची छाननी आणि ट्रकवर चढविणे बंदरापासून दूर करता येईल, यामुळे बंदरानजीकची बहुमूल्य जमीन वाचेल, तसेच टर्मिनलपर्यंत कंटेनरची जलद वाहतूक शक्य होईल. दरम्यान डी पी वर्ल्डने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे जहाजांचा वेळ वाचविण्यासाठी, सीमाशुल्क विभागाच्या तसेच इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञान बसविण्याचे आश्वासन दिले.

दुबईस्थित डी पी वर्ल्ड ही बंदरे आणि अंतर्देशीय टर्मिनल संचालन करणाऱ्या जगातली एक सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे दोन टर्मिनलचे संचालन करत आहे. डी पी वर्ल्डने राष्ट्रीय गुंतुवणूक आणि पायाभूत सुविधा निधीसोबत (नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एनआयआयएफ) भागीदारीत भारतातील बंदरे, टर्मिनल, वाहतूक आणि लॉजिस्टीक व्यवसायात तीन अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यानी ‘यूएई’स्थित थंबे समूहाशी (Thumbay Group) इरादा पत्रावर स्वाक्षरी केली. थंबे समूह विविध व्यवसायात असून, त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा क्षेत्रात विशेष रस आहे. या समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. थंबे मोईदिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने राज्यात प्रस्तावित सर्व आरोग्य सुविधा प्रकल्पात भागीदार होण्याचे आमंत्रण दिले.

दुबई येथून फडणवीस कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण कार्यास गती देण्यास महत्त्वाच्या उद्योगपतींशी संवाद साधतील, तसेच महत्त्वाच्या संस्थांना भेट देतील.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link