Next
मूकबधिर विद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन
BOI
Thursday, November 01, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this story

प्रदर्शनातील वस्तू पाहताना डॉ. यतीन पुजारी आणि मान्यवर.

रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संस्थेचे हे ३५वे प्रदर्शन असून, ते खास दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे. ते तीन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी. शेजारी मान्यवर.

या वेळी डॉ. पुजारी म्हणाले, ‘मूकबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वस्तू पाहून त्या त्यांनी बनविल्या आहेत, यावर विश्वासच बसला नाही. दिवाळीसाठी आवश्यक कलात्मक वस्तूंचे सुरेख प्रशिक्षण त्यांना शाळेत मिळते. जीवनोपयोगी वस्तू बनवल्यामुळे त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. शिक्षण आणि कला यांचा सुरेख संगम येथे पाहायला मिळाला.’ 

रांगोळ्या, पणत्या, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे छोटे पुतळे, उटणे, कापडी व लाकडी वस्तू-खेळणी, ग्रीटिंग्ज, करवंटीपासून वाद्यांचे शो-पीस विद्यार्थ्यांनी बनविले असून, या सर्व वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. डॉ. पुजारी यांनी शिक्षक व संस्थेचे कामकाज सुरेख चालले असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. शाळेमध्ये सध्या ३९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉलही येथे मांडण्यात आले आहेत.संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका अनुराधा ताटके, माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, सदस्य अर्चना जोशी, कलाकार शेखर जोशी, शिक्षक गजानन रजपूत, रमेश घवाळी, मंगल कोळंबेकर, सीमा मुळे, उपासना गोसावी, गायत्री आगाशे, स्पृहा लेले, प्रतिमा बोरकर, शीतल केळकर, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड हे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.दिवाळीनिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारापाशी मोठा किल्ला साकारला आहे. तसेच प्रदर्शनाच्या हॉलमध्ये २० बाय १० फूट आकाराची आकर्षक रांगोळी विद्यार्थ्यांनी साकारली आहे. 

(प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link