Next
पहिला ‘फोर के फूल एचडी क्लाउड टीव्ही एक्स२’ सादर
प्रेस रिलीज
Thursday, July 05, 2018 | 01:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : क्लाउडवॉकर कंपनीने देशातील पहिला ‘फोर के रेडी फूल एचडी स्मार्ट क्लाउड टीव्ही एक्स २’ सादर केला आहे. क्वॉड-कोर एआरएम कॉर्टेक्स प्रोसेसर,  एक जीबी रॅम आणि आठ जीबी रॉम सहित अँड्रॉईड ७.० नोगट संचालन प्रणालीद्वारे संचालित हा टीव्ही मेड-इन-इंडिया कंटेंट शोध इंजिनाने सुसज्जित असून, तो ३२ ते ५५ इंच आकारात फूल एचडी आणि एचडी रेडी रिझॉल्युशनमध्ये १४हजार९९० रूपयांपासून उपलब्ध असेल.

 सिनेमॅटिक अनुभव प्रदान करण्यास यात एक्सल्युमिनस डिस्प्ले, बॉक्स स्पिकर्स, इन-बिल्ट वाय-फाय आहे. या ‘क्लाउड टीव्ही एक्स २’ वर कधीही अँड्रॉईड टीव्ही इंटरफेसद्वारे चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, माहितीपट, संगीत, व्हिडिओ, अॅप्स आणि बरेच काही स्ट्रीम करू शकतात. सीशेअर मोबाईल रिमोट अॅपद्वारे मोबाईल फोनला रिमोट, एअर माउस किंवा वायरलेस कीबोर्डच्या स्वरूपात वापरता येतो.

क्लाउडवॉकरचे अध्यक्ष जगदिश राजपुरोहित म्हणाले, ‘हा भारतातील या प्रकारचा पहिलाच संपूर्णपणे फोर के रेडी फूल एचडी स्मार्ट टीव्ही आहे. भारतीय ग्राहकांची उत्कृष्ट गोष्टींची आस वाढत असल्याने ते या उत्पादनामुळे प्रफुल्लित होतील आणि वेगळ्या अशा स्मार्ट टीव्ही अनुभवाचा आनंद घेतील अशी आशा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link