Next
‘येस बँके’ची महाराष्ट्रातील स्मार्ट सिटींशी भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 02:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येस बँकेने शहर विकासाची आव्हाने हाताळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील पहिले ‘कोलॅबोरेशन-अॅज-ए-सर्व्हिस’ व्यासपीठ सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद व नाशिक स्मार्ट सिटींशी भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.

नव्याने दाखल केलेल्या येस स्केल स्मार्ट सिटी अॅक्सिलरेटरचा भाग म्हणून, बँकेने जगभरातील स्टार्टअपना बॉश व डेल ईएमसी अशा तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्यांशी सहयोग करण्याचे, तसेच संबंधित स्मार्ट सिटीशी नमूद केलेल्या समस्यांवर काम करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा भागीदार म्हणून, पीडब्लूसीने उपयुक्त भागीदारी करण्याचे व सल्लासेवा घेण्याचे, तसेच स्मार्ट सिटींमध्ये नाविन्यपूर्ण उपायांची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.

याविषयी बोलताना, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘देशात ‘कोलॅबोरेशन-अॅज-ए-सर्व्हिस’ अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने, तसेच शहरीकरणाकडे एक समस्या म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहण्याच्या उद्देशाने उचललेले हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. येस बँकेने ‘येस स्केल स्मार्ट सिटी अॅक्सिलरेटर’द्वारे सर्व क्षेत्रांत केलेल्या सहयोगामुळे या शहरांना लोक, प्रक्रिया व उपकरणे सुरळीतपणे एकमेकांशी जोडण्यासाठी आणि महसुलाचे नवे पर्याय निर्माण करण्याबरोबरच, नागरिकांच्या गरजा तातडीने पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय मिळतील. भारताला फ्रजाइल पाचपासून पाच ट्रिलिअन डॉलरची आर्थिक महासत्ता बनवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला अनुसरून हे धोरण आखण्यात आले आहे.’

येस बँकेच्या ‘येस स्केल स्मार्ट सिटी अॅक्सिलरेटर’ने स्टार्टअप्सना संपूर्ण शहरांमध्ये त्यांच्या उपायांची चाचणी, विकास व डिप्लॉयमेंट करण्यासाठी व देशभर त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुकूल व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांचे पाठबळ, डिजिटल पायाभूत सुविधा, पीओसी सपोर्ट, मार्गदर्शन, निधीचा पर्याय, जागतिक अनुभव यांचा समावेश आहे.

येस बँकेच्या भागीदार स्मार्ट सिटींनी त्यांच्या प्रशासनातील आव्हाने ओळखली असून, ती येस स्केल स्मार्ट सिटीद्वारे हाताळली जाणार आहेत. त्यामध्ये आयओटी, ब्लॉकचेन व एआय यांचा वापर करून शहरभर माहिती संकलन व विश्लेषण, ओपन डेटा टूलकिट तयार करणे, व्हिडिओ अॅनालिटिक्स, आयओटी व सेन्सर, बुद्धिवान, परिपूर्ण पब्लिक ट्रान्झिट सिस्टीम्स वापरून स्मार्ट ट्रॅफिक व पार्किंग व्यवस्थापन, ऑटोमेटेड ग्रिव्हन्स कलेक्शन व रिस्पॉन्स मॅनेजमेंट, स्मार्ट लेबल, टिपर्स व वेस्ट मॅप अशी इंटलिजंट वेस्ट मॅनेजमेंट सोल्यूशन, मीटरिंग व मॉनिटरिंग वॉटर सप्लाय, स्मार्ट एअर पोल्युशन मॉनिटर्स व कार्यक्षम कन्व्हर्टर्स, शारीरिक व्यंग असलेल्या नागरिकांना ऑटोमेटेड मदत करण्यासाठी सेन्सर्स व सेंट्रलाइज्ड डॅशबोर्ड यांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link