Next
शिरोळ आश्रमशाळेत शिक्षण जनजागृती कविसंमेलन
मिलिंद जाधव
Saturday, March 16, 2019 | 10:57 AM
15 0 0
Share this article:



शहापूर : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शिरोळच्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे शिक्षण जनजागृती कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ॲड. श्रीकृष्ण टोबरे यांनी भूषविले.

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कवितेतून कळावे म्हणून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शालेय जीवनावर आधारित कविता, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कविता, शिक्षणावर आधारित कविता, प्रबोधनात्मक कविता, मराठी साहित्य याबाबत प्रश्नोत्तरे, गद्य-पद्य, नाट्यावलोकन, लोकगीत, असा मनमोकळा संवाद विद्यार्थ्यांशी साधण्यात आला.

या वेळी ॲड. श्रीकृष्ण टोबरे, मास्टर राजरत्न राजगुरू, विजयकुमार भोईर, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, कवी दीप, ॲड. प्रज्ञेश सोनावणे, सुरेखा गायकवाड, मनिषा मेश्राम, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, राष्ट्रपाल काकडे, मारुती कांबळे, रमेश तारमळे, मंजुषा ओरपे, रामचंद्र जाधव यांनी आपल्या स्वरचित दर्जेदार कविता या वेळी विद्यार्थ्यांसमोर सादर करीत शिक्षणाबाबत जनजागृती केली.

विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना मराठी भाषेची अस्मिता जपण्यास विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. साहित्यिकांचा, समाजसुधारकांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून मराठी अस्मितेचा झेंडा शिखरावर नेऊन ठेवण्याचे आवाहन या वेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.

या प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भडगांवकर, मुख्याध्यापक आर. बी. फर्डे, अधीक्षक पी. पी. सोनावणे, शिक्षक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कलाध्यापक मारुती कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव यांनी केले. प्रा आर. के. वळींकर यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search