Next
‘सेफ किड्स’तर्फे फटाक्यांसंदर्भात सुरक्षा जागृती अभियान
प्रेस रिलीज
Thursday, October 25, 2018 | 04:06 PM
15 0 0
Share this article:पुणे : सेफ किड्स फाउंडेशन इंडिया (एसकेएफआय) या स्वयंसेवी संस्थेतर्फे पुणेकरांमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत आवश्यक असणार्‍या १० दिवसीय आग सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान हनीवेल प्रायोजित सेफ किड्स अ‍ॅट होम प्रोग्राममधील आग सुरक्षा पद्धती अधोरेखित केल्या जातील.

पुणे महानगरपालिका (पीएमसी) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रॅली, रोड शोज्, प्रदर्शने, वॉकथॉन, किड्स कार्निव्हल, पोस्टर मेकिंग स्पर्धा यांसारखे संवादात्मक उपक्रम आयोजित केले आहेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवकांना आगीच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी अग्नी सुरक्षा मित्र या नावाने फायर मार्शल्स म्हणून समाविष्ट केले जाणार आहेत. आतापर्यंत सेफ किड्स अ‍ॅट होम प्रोग्रामद्वारे असे ६२१ अग्नीसुरक्षा मित्र प्रशिक्षित केले गेले असून, ३०० मॉडेल फायर सेफ स्कूल्स व १०० मॉडेल फायर सेफ कम्युनिटीज् विकसित करण्यात प्रवर्तक ठरले आहेत.

या प्रसंगी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही आगीच्या आपत्कालीन प्रसंगी सामोरे जाण्यासाठी तयार आहोतच; परंतु त्याचबरोबर पुण्यातील नागरिकांनी फटाके उडविण्याच्या सुरक्षेबाबत उपाययोजना राबविल्यास आपण दिवाळी सुरक्षितपणे साजरी करू शकू; तसेच या अभियानासह आम्ही दरवर्षी या मोहिमेचा प्रसार वाढविण्यासाठी ‘एसकेएफआय’सोबत सहयोग करत आहोत.’

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले, ‘दिवाळीच्या काळात आमच्या दलातील अग्निशामक सावध (हाय अलर्ट) असतात. नागरिकांमध्ये विशेषत: मुले व त्यांचे पालक यांच्यात आगीच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढविल्यास प्रत्येकाकडून आमच्या प्रयत्नांना समर्थन मिळेल आणि आगीपासून होणार्‍या घटना कमी होण्यास मदत होईल.’

सेफ किड्स फाउंडेशनच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. सिंथिआ पिंटो म्हणाल्या, ‘दिवाळी हा असा काळ असतो ज्यावेळेस आगीशी निगडीत अपघात होण्याचा धोका जास्त असतो. भाजण्याच्या व जखमेच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबिण्याबाबतचे महत्त्व मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हे आमचे उद्दिष्ट आहे.’

आयएमआरबी रिसर्चचा पाठिंबा असलेल्या सेफ किड्स अ‍ॅट होम प्रोग्राममध्ये अद्ययावत प्रायोगिक व रंजक शैक्षणिक साधनांचा वापर करून २०१९पर्यंत चार लाख ८५ हजार मुले व चार लाख पालकांना फायदा व्हावा हे उद्दिष्ट आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search