Next
‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान
रत्नागिरीत गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना मानवंदना
BOI
Monday, November 12, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमातून तिन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी आणि युवा कलाकारांचे दमदार सादरीकरण ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. ब्राह्मण मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात कार्यक्रम झाला. सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी, आशा पंडित, राधिका वैद्य, प्रदीप तेंडुलकर, मधुसूदन लेले, दीपक पोंक्षे, सुहास सोहनी यांनी दीपप्रज्ज्वलन केले. कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी ‘सप्तसूर मुझिकल्स’चे निरंजन गोडबोले व विघ्नेश जोशी यांचा सत्कार केला. कलाकारांचे स्वागत अविनाश काळे, संदीप रानडे, राधिका वैद्य, अनुजा आगाशे यांनी केले. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात सुरुवातीला अजिंक्य पोंक्षे याने ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे गीत सुरेखपणे सादर केले. रसिकांच्या टाळ्या पडल्या आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी गदिमा, पुलं व बाबूजींच्या अनेक आठवणी ओघवत्या वाणीत सांगितल्या.

विघ्नेश जोशी यांचा सत्कार

इंद्रायणी काठी, शब्दावाचून कळले सारे, आकाशी झेप घे रे, ही गीते अजिंक्यने सुरेल आवाजात म्हटली व टाळ्या घेतल्या. कबिराचे विणतो शेले, हसले मनी चांदणे ही गीते युवा गायिका हिमानी भागवतने उत्तम प्रकारे सादर केली. एकाच या जन्मी, अहो सजणा दूर व्हा, गं बाई माझी करंगळी, ही गीते प्रियांका दाबके हिने सादर केली आणि त्यांना रसिकांनी दाद दिली. हरहुन्नरी गायक अभिजित भट याने, कधी बहर कधी शिशिर, स्वर आले दुरुनी, निजरूप दाखवा हो... ही वैविध्यपूर्ण गीते ताकदीने सादर केली. अभय जोग यांचे ‘पराधीन आहे जगती,’ अजिंक्य व हिमानीचे ‘विकत घेतला श्याम,’ हिमानी व अभिजितचे ‘स्वप्नात रंगले मी,’ अभिजित व प्रियांकाचे ‘नवीन आज चंद्रमा’ ही गीतेही तितकीच रंगली. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

निरंजन गोडबोले यांचा सत्कार

निरंजन गोडबोले (हार्मोनियम), चैतन्य पटवर्धन (की-बोर्ड), उदय गोखले (व्हायोलिन), निखिल रानडे (तबला) आणि हरेश केळकर (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. 

(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
समिता जोशी About 99 Days ago
खूपच छान
0
0
राजेंद्र भडसावळे About 99 Days ago
Very good
1
0

Select Language
Share Link