Next
‘ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहावे’
BOI
Wednesday, December 26, 2018 | 01:44 PM
15 0 0
Share this story



सोलापूर : ‘सध्याचे जग ग्राहक केंद्रीत आहे. ग्राहकाच्या गरजा भागविण्यासाठी प्रत्येक उत्पादक आणि सेवा देणारी कंपनी उत्सुक असते; मात्र ग्राहकांनी आपले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवावी. ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहावे,’ असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी येथे केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्राहक मेळावा, ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येथील शिवछत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील रावडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या शोभना सागर, श्रीमती गुंड-पाटील, ॲड. श्रद्धा भैराट, सदस्य प्रा. गणेश मेंगळे, सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी रमा जोशी आदी उपस्थित होते.

या वेळी ग्राहकांच्या हक्कांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक रमा जोशी यांनी केले. सुनील रावडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link