Next
‘पेटीएम’वर ‘म्युच्युअल फंड’चा निःशुल्क मागोवा
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पेटीएमचे वापरकर्ते आता त्यांच्या पेटीएम मनी अॅपवर त्यांच्या संपूर्ण म्युच्युअल फंड गुंतवणुकीची कामगिरी कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकणार असल्याची घोषणा नुकतीच ‘पेटीएम मनी’ने केली. यासाठी गुंतवणूकदारांना फक्त कार्वी फिनटेकद्वारा जनरेट करण्यात आलेले त्यांचे कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (सीएएस) पेटीएम मनीवर अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना आपल्या पेटीएम मनी अॅपवरच आपल्या पोर्टफोलियोतील संपूर्ण गुंतवणुकीचा माग ठेवता येणार आहे.

भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदार एएमसी, बँका, सल्लागार आणि वितरकांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांना या सर्व गुंतवणुकीची कामगिरी एकाच जागी पाहणे अवघड असते. पेटीएम मनीच्या या नवीन सुविधेमुळे वर्तमान १८ दशलक्षपेक्षा जास्त म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांची सर्व गुंतवणूक एकाच जागी पाहण्याची सोय होणार आहे; तसेच त्यांनी कुठूनही गुंतवणूक केली असली, तरी ते आपल्या पोर्टफोलियोच्या दैनिक कामगिरीचादेखील माग ठेऊ शकणार आहेत.

या विषयी बोलताना ‘पेटीएम मनी’चे पूर्णवेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, ‘पेटीएम मनी वापरकर्त्यांनी त्यांच्या बाह्य गुंतवणुकी आमच्या मंचावर आणण्यासाठी आम्हाला विनंती केली होती. यामुळे गुंतवणूकदाराला एकाच जागी आपल्या संपूर्ण गुंतवणुकीचा माग ठेवण्यात आणि भविष्यात गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासही मदत होणार आहे. आमच्या इन्व्हेस्टर-फर्स्ट सिद्धांतास अनुरूप असे हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा अनुभव सोपा आणि चांगला करण्यासाठी पेटीएम मनी आपली उत्पादने आणि टेक्नॉलॉजी ऑफरिंग यात नाविन्य आणत आहे. या कंपनीने ३४ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीसोबत भागीदारी केली आहे, ज्यात म्युच्युअल फंड उद्योगातील ९४ टक्क्यांपेक्षा जास्त ‘एयूएम’ सामावले जात आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search