Next
खासदार शिरोळेंनी घेतला स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांचा आढावा
प्रेस रिलीज
Thursday, December 14 | 12:29 PM
15 0 0
Share this story

खा. अनिल शिरोळे, सीईओ राजेंद्र जगताप व अन्य अधिकारीपुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी १३ डिसेंबर रोजी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह एमएनजीएल, बीएसएनएल, महानगरपालिकेतील पाणीपुरवठा, वाहतूक अशा अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत वेगवेगळ्या विभागांच्या कामाची माहिती, तसेच त्यांचे आगामी नियोजन याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना खासदार शिरोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. "विविध विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे कामात यापूर्वी निर्माण झालेल्या त्रुटी यापुढील काळात राहणार नाहीत, याची योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे," असे शिरोळे यांनी बैठकीत नमूद केले. "आगामी कलावधीत होणार्यात कामांचा साप्ताहिक मागोवा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आली आहे," असे सीईओ राजेंद्र जगताप यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

बाणेर बालेवडी भागातील सुरू असलेल्या कामांची खासदार अनिल शिरोळे यांनी १५ दिवसांपूर्वी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. त्या दरम्यान त्यांनी परिहार चौकातील रस्ता, तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत बनविण्यात येणाऱ्या बागेचीदेखील पाहणी केली होती. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link