Next
स्मार्ट सिटीत आता ‘स्मार्ट बसथांबे’
खासदार शिरोळे यांच्या निधीतून पीएमपीएमएलला तीन कोटी
BOI
Thursday, November 29, 2018 | 03:03 PM
15 0 0
Share this story

फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील स्मार्ट बसथांब्याचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राम मेहेत्रे, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, किरण ओरसे आदी.

पुणे : स्थानिक पातळीवरील दळणवळणात अंतर्गत बस वाहतूक महत्त्वाचा भाग आहे. ही वाहतूक कार्यक्षम करीत असताना स्मार्ट सिटीतील बसथांबेदेखील ‘स्मार्ट’ आणि नागरिकांच्या सोयीचे असावेत या विचारातून पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून शहरात विविध ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे बसथांबे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमा अंतर्गत पहिल्या सहा बसथांब्यांचे लोकार्पण गुरुवारी (२९ नोव्हेंबर) करण्यात आले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील बसथांब्याचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांनी केले. पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राम मेहेत्रे, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, किरण ओरसे, नंदू मंदोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना अनिल शिरोळे म्हणाले,‘पुणे शहरात स्थानिक बस वाहतूक हा महत्त्वाचा विषय आहे. या वाहतुकीमध्ये बसथांबा हा नागरिकांच्या जवळचा विषय असतो. बस मिळणे, बस मिळेपर्यंत वाट पहाणे आणि सुरक्षितता या सर्वच गोष्टी या बस थांब्याशी निगडीत असतात. त्यामुळे हे बसथांबे प्रवासी नागरिकांना सोयीचे आणि उपयोगी असावेत याबरोबरच त्याचा अडथळा हा वाहतूक आणि पादचारी या दोहोंना होऊ नये यासाठी आम्ही स्टेनलेस स्टीलचे हे खास बसशेड डिझाईन करून, बनवून घेतले आहेत. या बसशेडमुळे नागरिकांची नक्की चांगली सोय होईल.’


बस शेडची माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘बस शेड हे प्रवाशांना सोयीचे, फायदेशीर आणि उपयुक्त असावेत या विचाराने आम्ही स्टेनलेस स्टीलमधील २० फुट बाय ५ फुट या आकारातील हे शेड खास डिझाईन करून घेतले आहेत. यामध्ये साधारणत: १३ ते १४ फूटची स्टेनलेस स्टीलची आसन व्यवस्था असून, ३ फुट जागा ही दिव्यांग व्यक्तींना सहजपणे शेडमध्ये थांबता यावे यासाठी रिकामी ठेवण्यात आली आहे. याबरोबरच प्रवाशांना सुलभपणे शेड वापरता येईल. या दृष्टीने त्याचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्यास बॉक्स टाईप छत आहे. या डिझाईनमुळे फुटपाथच्या कमीत कमी जागेचा वापर होणार आहे. याशिवाय बसशेडच्या दर्शनी भागात बस थांब्याचे नावदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या शेडच्या मागील बाजूस सुमारे चार फुट बाय चार फुट एवढ्याच आकाराचा जाहिरातीचा बॉक्स ठेवण्यात आला असून, त्यामुळे मागील बाजूचे दुकानदार अथवा कार्यालये यांना या शेडचा त्रास होणार नाही. पुण्यासारख्या स्मार्ट शहरात अशा पद्धतीचे ‘स्मार्ट’ आणि वापरण्याजोगे बसथांबे करण्याचे पुणे परिवहन महामंडळाचे स्वप्न होते. या एका बसशेडसाठी तीन लाख रुपये इतका खर्च असून, शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी यासाठी आम्हाला आपल्या स्थानिक विकास निधीमधून रुपये तीन कोटींची मदत केली याबद्दल पीएमपीएमएलच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत.  शहरातील जुनी व मोडकळीस आलेली बसशेड काढून तेथे ही नवीन १०० स्टेनलेस स्टीलची बसशेड खासदार निधीमधून उभारण्यात येणार आहेत.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link