Next
‘हेरिटेज इव्हेंट्स’च्या वतीने गायन स्पर्धेचे आयोजन
सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त उपक्रम
BOI
Friday, September 14 | 11:40 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हेरिटेज इव्हेंट्स’च्या वतीने सुधीर फडके उर्फ बाबुजी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘बाबुजींची गाणी’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील इच्छुकांना या गायन स्पर्धेत भाग घेता येणार असून, स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार २९ सप्टेंबर व रविवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क घेण्यात येणार असून, पौड रस्त्यावरील ‘हेरिटेज द आर्ट लिगसी’ या ठिकाणी ही स्पर्धा पार पडेल’, अशी माहिती संतोष पोतदार यांनी दिली.

‘स्पर्धेसाठी तीन वयोगट असून, आठ ते १६ हा पहिला वयोगट, १७ ते ४० हा दुसरा वयोगट, तर ४० वर्षांपुढे असा तिसरा वयोगट असणार आहे. यामध्ये महिला, पुरुष अशा दोघांनाही भाग घेता येणार आहे. गायन स्पर्धेत गीतरामायणा व्यतिरिक्त बाबुजींनी स्वरबद्ध केलेल्या व गायलेल्या गाण्यांचा समावेश स्पर्धकांना करता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्हे, रोख व वस्तू स्वरूपातील तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतची भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली असून, प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते घोषित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना २१ ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकाला बाबुजींचे सुपुत्र, गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या उपस्थितीत एक स्वतंत्र गाणे गाण्याची संधी देखील मिळणार आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शहरातील व राज्यातील अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित असणार आहेत. श्रीधर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज गुरुवार, १३ सप्टेंबरपासून  ‘हेरिटेज द आर्ट लिगसी’, श्री प्रसाद बिल्डींग, पौड रोड, पुणे येथे  आणि पिंपरी चिंचवड भागातील इच्छुकांसाठी शरद शिधये, ५, पुष्पांजली, २८२/ ३३, तानाजीनगर, शिवाजी उदय मंडळा जवळ, चिंचवड आणि तानसेन संगीत विद्यालय, १० श्रीराम राज पार्क, श्रीराम मंदिराजवळ, चिंचवड या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत’, असेही पोतदार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link