Next
आरोग्यम् धनसंपदा
BOI
Wednesday, May 15, 2019 | 10:31 AM
15 0 0
Share this article:

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे; मात्र आपल्याच देशात याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मानले जात असले, तरी आता थोडी जागृती झाली आहे. पंचकर्म, आयुर्वेद चिकित्सेकडे रुग्ण आवर्जून वळत आहेत. आयुर्वेदासंबंधीचे गैरसमज दूर करून त्यातील चिकित्सेबद्दल सांगण्यासाठी डॉ. संजय द. सदावर्ते यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे पुस्तक लिहिले आहे. आयुर्वेदानुसार वात, कफ, व पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची लक्षणे, आहाराची माहिती दिली आहे. मलोत्पत्ती, रस, विपाक, वीर्य, विरुद्ध आहार-विहार, गर्भसंस्कार, दंतधावन विधी, आयुर्वेदोक्त स्नान, पौष्टिक न्याहरी आदींबद्दल सांगून कोमट पाणी पिण्याचे लाभही सांगितले आहेत. पानफुटी, अडुळसा, दूर्वा, जांभूळ, कोरफड, हिरडा, ब्राह्मी, धणे आदी औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोगही पुस्तकात दिले आहेत. घोळणा फुटणे, मूळव्याध, स्थौल्य, टॉन्सिल्स, मुखदूषिका, रांजणवाडी, उंची वाढविणे, शीतपित्त आदी विविध व्याधी आणि त्यावरील उपचार यातून समजतात. आयुर्वेदातील महत्त्वाचे अंग असलेल्या पंचकर्माची माहितीही या पुस्तकातून मिळते.

पुस्तक : आरोग्यम् धनसंपदा
लेखक : डॉ. संजय सदावर्ते
प्रकाशन : नावीन्य प्रकाशन
पृष्ठे : १४८
मूल्य : १५० रुपये

(‘आरोग्यम् धनसंपदा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search