Next
‘अ‍ॅपल मिशन’चे तंबाखूविरोधी जागृती अभियान
मिलिंद जाधव
Saturday, June 08, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : येथील अ‍ॅपल मिशन या संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. अनिल काशी मुरारका यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह मुंबईतील रस्त्यांवर तंबाखूविरोधी एक आगळीवेगळी मोहीम राबवत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांना भेटून त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देत आहेत.

डॉ. अनिल यांनी मुंबईच्या रस्त्यांवर उतरून तंबाखूचे व्यसन असलेल्या विविध क्षेत्रांतील नागरिकांना भेटले. त्यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर चर्चा करून त्यांच्याशी सवांद साधला आणि त्यांना धुम्रपान सोडण्यास आणि तंबाखू उत्पादनांचा वापर करण्यापासून दूर राहाण्याचे आवाहन केले. 

या अभियानाबाबत डॉ. अनिल म्हणाले, ‘तंबाखूचा वापर हा भारतातील एक गंभीर समस्या आहे. कमी शिक्षित आणि योग्य मार्गदर्शनचा अभाव, सहकारी दबाव आणि मुलांमध्ये वरिष्ठांचे अनुकरण करण्याचा आग्रह, गैरसमज, तणाव आदींमुळे नागरिक तंबाखूच्या आहारी जातात. विविध प्रकारची तंबाखूची सहज उपलब्ध होणारी उत्पादने आणि नावीन्यपूर्ण जाहिराती लोकांना तंबाखूच्या वापराकडे आकर्षित करतात. यामुळे बर्‍याच वर्षांपासून त्यांचा वापर आणि गैरवर्तन यामध्ये सतत वाढ झाली आहे. तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांना आपण जेव्हढे दूर करू शकतो तेव्हढे प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. यामुळे लोकांना आपण शिक्षित केले, तर ते स्वत:ची या व्यसनापासून सुटका करण्यास नक्‍कीच मदत करू शकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search