Next
अयान अली बंगश यांना ‘स्वरगौरव पुरस्कार’
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this story

तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुप यांच्यावतीने अयान अली बंगश यांना ‘स्वरगौरव पुरस्कार’ देऊन गौरविताना रोहित मुजुमदार (डावीकडून) आणि विनायक घोरपडे. शेजारी  सत्यजित तळवलकर.

पुणे : नवोदित आणि विश्वासू कलाकाराचे कौतुक व्हावे या उद्देशाने यावर्षीपासून तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुप यांच्यातर्फे संयुक्तपणे ‘स्वरगौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यावर्षीचा पहिला पुरस्कार प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांना एमईएस बालशिक्षणच्या सभागृहात झालेल्या ‘स्वरपर्व’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

या वेळी ‘तालानुभूती’चे संस्थापक रोहित मुजुमदार, एमपी ग्रुपचे संचालक विनायक घोरपडे, तबलावादक सत्यजित तळवळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अयान यांनी केलेल्या सरोदवादनाने पुणेकरांची नववर्षाची सकाळ सुमधुर झाली. पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे शिष्य व सुपुत्र अयान हे सेनई बंगश घराण्याच्या नवव्या पिढीतील सरोद वादक आहेत. त्यांच्या दमदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सरोद वादनाची अनुभूती १८ मार्चला  पुणेकरांनी घेतली.   

अयान यांनी राग ललितने वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, आडा, चौताल आणि झपताल यांचे सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी राग आनंद भैरव सादर केला. यामध्ये पंचम सवारी आणि तीन तालातील काही रचना सादर करत त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. धृत तालात सादर केलेल्या बंदिशीने अयान यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link