Next
‘ईपेलेटर’ची ‘ऑनलाईन तयारी’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, July 18 | 12:28 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ईपेलेटर’ या फिनटेक कंपनीने ‘ऑनलाईन तयारी’ या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य पुरवणाऱ्या ऑनलाईन कंपनीशी भागीदारी केली आहे. यामुळे ‘ईपेलेटर’वर साइनअप केलेल्या ग्राहकांना ऑनलाइन कोर्सेस आणि टेस्ट्ससाठी ‘ऑनलाईन तयारी’वरून आपल्या क्रेडिट लिमिटनुसार पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. 

‘ऑनलाईन तयारी’ ही अॅप आणि वेबसाइटमार्फत सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य पुरवणारी कंपनी आहे, तर ‘ईपेलेटर’ हे एक ‘आत्ता खरेदी करा, पैसे नंतर द्या’ अशी सुविधा देणारे पेमेंट सोल्युशन आहे. ज्याच्या मार्फत ग्राहकांना एक क्रेडिट लिमिट मिळते व त्यामुळे जलद ऑनलाइन खरेदी करणे शक्य होते. ‘ईपेलेटर’च्या ग्राहकांना २० हजार रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट आणि खरेदी केल्यापासून पेमेंट करेपर्यंत १४ दिवसांचा व्याज मुक्त अवधी मिळते. प्रत्येक वेळी बँक/कार्ड तपशील भरण्याच्या त्रासाशिवाय ‘ईपेलेटर’ एक सुलभ पेमेंट अनुभव देतो. 

या बाबत अधिक माहिती देताना ‘ईपेलेटर’चे सह-संस्थापक उदय सोमायाजुला म्हणाले, ‘ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात खूप वृद्धी झाली आहे. त्यामुळे त्याचा लाभ घेणारे तरुण व्यावसायिक आणि वेळ व पैशाबाबत जागरूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ईपेलेटर’ हा पसंतीचा पर्याय ठरेल.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link