Next
पुण्यात ‘महारेरा’च्या ‘एक्स्पर्टस ट्रेनर्स’ उपक्रमाला सुरुवात
प्रेस रिलीज
Wednesday, February 20, 2019 | 12:47 PM
15 0 0
Share this article:पुणे : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) यांच्यातर्फे ‘ट्रेनिंग ऑफ एक्स्पर्टस ट्रेनर्स’ या उपक्रमाला १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पुण्यात सुरुवात करण्यात आली. उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांच्या हस्ते नांदेड सिटी येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

या प्रसंगी क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचाल डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का यांबरोबरच कुशल क्रेडाईचे समीर बेलवलकर, कपिल त्रीमल, अभिजित अचलारे, महारेराचे मुख्य तांत्रिक अधिकारी ज्ञानेश्वर हडदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना चॅटर्जी म्हणाले, ‘‘महारेरा’अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात एकूण ‘रेरा’ कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांपैकी ५० टक्क्यांहून अधिक प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. ‘रेरा’ कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये ‘महारेरा’च्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळेच हे शक्य झाले. आज देशात ३५ हजार प्रकल्प ‘रेरा’ नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे १८ हजार प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. ‘रेरा’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य कायमच अग्रेसर राहिले.’   ‘या ‘रेरा’ कायद्याअंतर्गत बांधकामाच्या दर्जाविषयीदेखील काही तरतुदी आहेत. बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाच वर्षांपर्यंत बांधकाम पद्धतीतील काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला याविषयी ‘रेरा’कडे दाद मागता येते. या त्रुटी येऊ नयेत आणि बांधकाम सुरू असतानाच बांधकाम साहित्याचा दर्जा आणि बांधकाम प्रक्रियेची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखली गेली, तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या या तक्रारी नक्कीच कमी होतील. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आम्ही येत्या पाच वर्षांत राज्यातील १५ लाख कामगारांना याविषयीचे प्रशिक्षण देण्याचा विडा उचलला आहे,’ असे चॅटर्जी यांनी सांगितले.

‘कामगारांची ही संख्या अतिशय मोठी असल्याने त्यांना प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे. नेमकी हीच गरज ओळखून आम्ही असे ५०० तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करीत आहोत. हे ५०० तज्ज्ञ प्रशिक्षक ‘महारेरा’ नोंदणीकृत बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांवर जाऊन तेथे कार्यरत असलेल्या बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देतील. या अंतर्गत पुणे विभागात सुमारे २२५ तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्यात येतील ज्यासाठी आम्ही क्रेडाई पुणे मेट्रोची मदत घेत आहोत. कुशल क्रेडाईच्या माध्यमातून अशा प्रकारचे काम करण्याचा त्यांना अनुभव असल्याने हे सर्व सहज शक्य होईल, अशी मला खात्री आहे,’ असे चॅटर्जी यांनी नमूद केले.

‘महारेरा’तर्फे या ५०० तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या उपक्रमात बार बेंडिंग, शटरिंग, रंगकाम, गवंडीकाम, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल आदीविषयक प्रशिक्षणाचा समावेश आहे.  हे ५०० प्रशिक्षक पुढील एका वर्षात तयार करण्याचा ‘महारेरा’चा मानस आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी नांदेड सिटी येथे विशेष ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन चॅटर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये सभागृह, वर्कशॉप, टूल्स डिस्प्ले एरिया आणि क्लासरूम्स अशा सोई-सुविधा उभारण्यात आल्या आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search