Next
विशेष मुलांनी घडविले गणेशरूपांचे ‘आविष्कार’
रत्नागिरीतील आविष्कार संस्थेत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा
BOI
Tuesday, September 11, 2018 | 04:36 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील विशेष मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकारच्या साहित्यातून गणेशरूपे साकारली आणि पर्यावरणपूरक व कलात्मक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या हातून घडलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन पाहणारे थक्क होत होते. (प्रदर्शनाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

संस्थेतील सविता कामत विद्यामंदिर आणि श्यामराव भिडे कार्यशाळेचे विद्यार्थी गटानुसार, तसेच विभागानुसार श्री गणेशाची पर्यावरणपूरक चित्रे व प्रतिमा बनवत असतात. त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असून, यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडला. १० आणि ११ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. 

गेली अनेक वर्षे ७० टक्के कागदी लगदा आणि ३० टक्के शाडूची माती अशा मिश्रणातून कार्यशाळेचे विद्यार्थी सुंदर अशी ‘आविष्कारच्या राजा’ची मूर्ती साकारतात. त्याचप्रमाणे याही वर्षी साकारली होती. या मूर्तीची १० सप्टेंबरला ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य द्वारापासून मिरवणूक काढून ज्ञानेश्वर वंडकर प्रार्थनागृहामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

सोमवारी (१० सप्टेंबर) प्रतिष्ठापनेनंतर पूजा, आरती, नैवेद्य झाल्यावर श्यामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी भजन केले. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांनी सोमवारी दुपारी बाप्पासमोर सगळ्या मुलांच्या आवडीची गाणी व्हायोलिनवर सादर केली. ११ सप्टेंबरला सकाळी आरती झाली, नंतर ‘जीजीपीएस’ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे भजन झाले. त्यानंतर ‘आविष्कार’च्या सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे भजन, आरती आणि विसर्जन मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली.

चित्रांचे प्रदर्शन
‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या श्री गणेशाच्या विविध रूपांचे प्रदर्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. त्याला रत्नागिरीकरांनी भेट दिली. या दोन दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे सण समारंभातून मिळून मिसळून राहण्यासाठीचे शिक्षण मिळते. तसेच गणेशमूर्ती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा प्रत्यक्ष कृतीद्वारे अनुभव मिळतो, असे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी सांगितले. 

(‘आविष्कार’ संस्थेबद्दल सविस्तर माहिती देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘आविष्कार’च्या मुलांनी साकारलेल्या गणेशरूपांचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. ) 


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search