Next
साता समुद्रापार आठ देशांत...
BOI
Thursday, November 23 | 03:07 PM
15 0 0
Share this story

साता समुद्रापार गेलेल्या मराठी माणसांसाठी आठ देशांत पाठोपाठ दौरे करून ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचे प्रयोग करण्याचा अनोखा विक्रम प्रशांत दामले आणि त्यांच्या सहअभिनेत्यांनी केला आहे. हा अनुभव नक्कीच आनंददायी होता, अशी भावना प्रशांत दामले यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केली.
.................
गेल्या काही दशकांपासून शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि अलीकडे चक्क पर्यटनासाठीसुद्धा मराठी माणसाच्या परदेशवाऱ्या वाढल्या आहेत. आज सर्वच खंडांत आणि देशांत मराठी माणूस स्थायिक झालेला आहे; पण केवळ नाटकाचे प्रयोग करण्यासाठी परदेशांत जाणाऱ्यांमध्ये आघाडीचे नाव म्हणजे प्रशांत दामले. 

मराठी रंगभूमीवरचा सुपरस्टार.... १२ हजारांपेक्षा जास्त नाट्यप्रयोग गाठीशी असणारे प्रशांत दामले गेली तीसेक वर्षं परदेशात जाऊन आपल्या नाटकांचे प्रयोग करत आहेत.

पूर्वी अटकेपार झेंडे लावणारा मराठी माणूस आता साता समुद्रापार स्थायिक झाला आहे आणि त्यांच्या प्रेमाखातर प्रशांत दामले नुकतेच साता समुद्रापार आठ देशांत प्रयोग करून आले. त्यांच्या या अनोख्या विक्रमाबद्दल त्यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यासाठी पाहा सोबतचा व्हिडिओ...


(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्तानं प्रशांत दामले यांनी व्यक्त केलेल्या त्याबद्दलच्या आठवणींचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link