Next
साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये अत्‍याधुनिक कॅथलॅब मशिन
प्रेस रिलीज
Tuesday, May 29, 2018 | 05:36 PM
15 0 0
Share this article:



शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था या संस्थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सुमारे पाच कोटी रुपये किंमतीच्‍या नवीन अत्‍याधुनिक कॅथलॅब मशिनचे उद्घाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

या प्रसंगी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका मैथिली पितांबरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मनोहर शिंदे, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे व शिमाडझु या कंपनीचे योगेश मालपाणी आदी मान्‍यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. हावरे म्‍हणाले, ‘श्री साईबाबा संस्‍थानतर्फे श्री साईबाबा सुपर‍स्‍पेशालिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय हे दोन रुग्‍णालय चालवली जातात. यामध्‍ये श्री साईबाबा सुपरस्‍पेशालिटी हॉस्पिटलमध्‍ये हृदय रोग, मेंदुरोग, मणक्याचे, अस्थिरोग आदी आजारांवर शस्त्रक्रिया केल्‍या जातात. ज्‍या रुग्‍णांकडे पिवळे व केसरी रेशनकार्ड आहे त्‍यांच्‍यावर महात्‍मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत शस्‍त्रक्रिया केल्‍या जातात. या रुग्‍णालयात ‘दवा बरोबरच दुवाँ’ ही दिला जातो. या रुग्‍णालयाने गेल्‍या पाच वर्षांत महात्‍मा फुले जीवनदायी योजनेत राज्‍यात सर्वाधिक हृदय शस्‍त्रक्रिया करण्‍याचा विक्रम केलेला आहे. या रुग्‍णालयातील जुने कॅथलॅब मशीन १५ वर्ष वापरून ते बदलण्‍यात आले. त्‍याजागी सुमारे पाच कोटी रुपये किंमतीचे जपानच्‍या शिमाडझु या कंपनीचे अत्‍याधुनिक मशीन बसविण्‍यात आले आहे. या मशीनची गॅरंटी १० वर्षांची, असून पाच वर्षांची सर्व्हिस वॉरंटी आहे. या मशिनची २५० शस्‍त्रक्रिया करून चाचणी ही केली आहे.’

‘संस्‍थानच्‍या या रुग्‍णालयासाठी अत्‍याधुनिक एमआरआय व सिटी स्‍कॅन मशिन घेण्‍यात येणार असून, सुमारे २५० विविध मशिनरी लवकरच बदलण्‍यात येतील. त्‍यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांसह मशिनरीच्‍या बाबतीत हे रुग्‍णालय अत्‍याधुनिक होईल. राज्‍यातील अधिकाधिक रुग्‍णांनी संस्‍थानच्‍या या रुग्‍णालयाचा लाभ घ्‍यावा,’ असे आवाहन डॉ. हावरे यांनी या वेळी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search