Next
टीसीएस निंजा ओपन कॅम्पसमध्ये ‘डीकेटीई’च्या ३४ विद्यार्थ्यांची निवड
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 01:27 PM
15 0 0
Share this article:

टीसीएस निंजा ओपन कॅम्पसमध्ये कंपनीत निवड झालेले डीकेटीईचे विद्यार्थी.इचलकरंजी : यंदा टीसीएस निंजा टेस्ट ही भारतात सर्वत्र एकाच दिवशी घेण्यात आली. यात अंतिम मुलाखतीतून ‘डीकेटीई’ संस्थेच्या सर्वाधिक ३४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

संस्थेमध्ये अशा मुलाखतींच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात; तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या अ‍ॅप्टीट्युट टेस्टमध्ये या तयारीचा खूप उपयोग झाला आणि ३४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

निवड झालेले विद्यार्थी असे : कॉम्प्युटर विभाग- प्रीतम पाटील, शाम पटेल, दुर्गा गोखले, नेहा वैष्णव, निहीत राठी, पूजा देसाई, दीपाली पाटील, आकाश यादव, सिद्धार्थ किट्टद, आशिका पौरवाल. ईटीसी विभाग- ऋचा पुजारी, शामली शेळके, श्‍वाती शिवलिंगे, स्नेहा लायकर, स्नेहल पाटील, चेतना खंजिरे. आयटी विभाग- सुमन ओझा, मिनाश्री मुचंडी, पूजा पंजवाणी, ऋतुजा सदलगे, ऋतुजा पालकर. इलेक्ट्रॉनिक्स विभाग- अखिलेश केळकर, शिवानी म्हेतर, प्रियांका मुथा, प्रथमेश पताडे, अमृता मुळे, पूजा पाटील, आरती पाटील, हार्षदा हाणबर. मेकॅनिकल विभाग- अमोद कुलकर्णी, किरण महामुनी, सैफ मुल्लाणी, भगवान कदम, पवन सुर्वे. 

या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. या विद्यार्थ्यांस संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यू. जे. पाटील, डे.डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, डॉ. डी. व्ही. कोदवडे, डॉ. एस. ए. पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search