Next
काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ख्रिसमस संध्या’
स्वावलंबन, समुपदेशन, रोजगारासह विविध मोफत योजनांचा शुभारंभ
प्रेस रिलीज
Monday, December 24, 2018 | 12:42 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त  २५ डिसेंबर २०१८ रोजी सर्वधर्मियांसमवेत ख्रिसमस संध्याचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती माजी उपमहापौर, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
 
अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सायंकाळी चार वाजता ख्रिसमस संध्या कार्यक्रम होणार असून, बालगोपाळांसाठी बालमेळावा, सांताक्लॉजच्या हस्ते खाऊ वाटप, तसेच पालकांबरोबरच तरुणाई, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वावलंबन, समुदेशन, रोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण आदी विविध मोफत योजनांचा शुभारंभ या प्रसंगी केला जाणार आहे.’

ख्रिसमस संध्याचे हे २० वे वर्ष असून, या वेळी माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.
 
यावेळी संयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ख्रिसमस संध्येविषयी :
दिवस :
मंगळवार, २५ डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search