Next
‘आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज’
प्रेस रिलीज
Monday, February 04, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this story



औंध : ‘नैसर्गिक, मानवी आणि जैविक असे आपत्तींचे तीन प्रकार असून, या सर्व आपत्तींचे पूर्व नियोजन करणे ही काळाची गरज आहे, कारण अशा आपत्तींमुळे  मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते,’ असे प्रतिपादन प्रा. हर्षकुमार घळके यांनी केले.



येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी प्रा. घळके बोलत होते. ते म्हणाले, ‘कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जे संकट येते, तिला आपत्ती असे म्हणतात. नैसर्गिक, मानवी आणि जैविक अशा तीन प्रकारांमध्ये तिचा समावेश होतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळे, पूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. मानवी आपत्तीमध्ये आग लागणे, युद्ध, अपघात, दहशतवाद,  बॉम्बस्फोट, संप व टाळेबंदी इतर आपत्तींचा, तर जैविक आपत्तीमध्ये मलेरिया, कॉलरा (पटकी), धनुर्वात यांसारख्या विषयांचा समावेश होतो. या सर्व आपत्तींचे पूर्व नियोजन करणे ही काळाची गरज आहे. कारण अशा आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. नैसर्गिक आणि जैविक आपत्तींपासून निर्माण झालेले नुकसान लवकर भरून काढणे शक्य होत नाही. मानवी आपत्तीचे व्यवस्थापन तत्काळ करता येणे शक्य असते. आपणास आपत्ती व्यवस्थापनाबद्दल चांगली माहिती असेल, तर जीवितहानी कमी प्रमाणात होऊ शकते.’



कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन कशाप्रकारे करावे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळावे या हेतूने हे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चेअरमन प्रा. प्रदीप भिसे यांनी करून दिली. प्रा. सायली गोसावी यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. अतुल चौरे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link