Next
‘बोट क्लब’चा १५०वा वर्धापन दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, May 12 | 05:15 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘द रॉयल कनॉट बोट क्लब’चा १५०वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या प्रसंगी ‘द रॉयल कनॉट बोट क्लब’चे अध्यक्ष बाळकृष्ण हेगडे, मानद सचिव अरुण कुदळे, आजी-माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय समिती सदस्य उपस्थित होते. कुदळे यांनी क्लबची आतापर्यंतची वाटचाल याचा आढावा घेतला. क्लबचे अध्यक्ष हेगडे यांनी भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. त्यामध्ये नवीन इमारत व स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा समावेश आहे.

‘द रॉयल कनॉट बोट क्लब’ची स्थापना १८६८मध्ये करण्यात आली होती व यावर्षी वैभवशाली १५०वर्षे पूर्ण करीत आहे. याप्रसंगी ११ माजी अध्यक्षांचा सत्कार ​​करण्यात आला. यामध्ये मेहेर अंकलेसरिया, श्री. जैनुद्दिन, चंद्रकांत शिरोळे, शरद बावडेकर, रमेश जोशी, विजय भावे, अविनाश पुंडलिक, सुभाष जोशी, अनिल पत्की, अजय गुजराथी आणि गोपाल दास दावरा यांचा समावेश होता.

महापौर टिळक म्हणाल्या की, ‘द रॉयल कनॉट बोट क्लबने आपली १५० वर्षांची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केल्याने मी त्यांचे अभिनंदन करते. विविध क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा क्लब नेहमीच आघाडीवर असतो. यासाठी गेली अनेक वर्षे क्लबतर्फे विविध क्रीडाप्रकारातील स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अशा स्पर्धांच्या माध्यमातून गुणवान खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. क्लबच्या भविष्यातील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते.’

१५०वे वर्ष साजरे होत असताना क्रीडा उपक्रमांमध्ये क्लबतर्फे अधिक विस्तार केला जाईल. सध्या १२ वर्षांखालील वयोगटासाठी टेनिस टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे; तसेच लवकरच महाराष्ट्र स्टेट इनडोअर रोईंग चॅंपियनशिपचे आयोजन केले जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link