Next
‘ अॅटलास कॉप्को ’तर्फे ‘स्मार्ट कनेक्टेड अॅसेम्ब्ली’ सुविधा
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 04:49 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : भारतीय ग्राहक सातत्याने उच्च दर्जाच्या उत्पादनांची व नव्या तंत्रज्ञानाची मागणी करत असल्याने उत्पादन व अॅसेम्ब्ली यांच्या डिजिटायझेशनच्या माध्यमातून अॅटलास कॉप्को (इंडिया) लि.ने  ‘स्मार्ट कनेक्टेड अॅसेम्ब्ली’ दाखल केली आहे. त्यामुळे लवचिकता, डाटा अॅनालिटिक्स, अर्गोनॉमिक्स व ऊर्जाक्षमता असे फायदे मिळतात. स्मार्ट कनेक्टेड अॅसेम्ब्लीमुळे पूर्णतः नव्या तंत्रज्ञानावर आधारित पर्यायांमुळे ही नवे आव्हाने, ट्रेंड व गरजा यांची पूर्तता केली जाईल.   

‘स्मार्ट कनेक्टेड अॅसेम्ब्ली म्हणजे अॅसेम्ब्लीशी संबंधित सर्व प्रक्रिया एकत्र जोडून विशेष मूल्य निर्माण करणे. अॅसेम्ब्ली सोल्यूशन्स एकमेकांशी जोडलेल्या असतात व प्रॉडक्शन नेटवर्कमध्ये एकात्मिक केल्या जातात. निर्माण होणारा डाटा म्हणजे नवा कच्चा माल असतो, ज्याचा वापर अॅसेम्ब्ली प्रक्रियेमधील व दरम्यानच्या बाबतीतील सुधारणा करण्याची क्षेत्रे ठरवताना व नियंत्रित करताना वापरला जातो,’ अशी माहिती अॅटलास कॉप्को (इंडिया) लि.चे जनरल मॅनेजर भाविन पंड्या यांनी दिली.

भारतातील ऑटोमोबाइल उद्योग जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा असून, ‘अॅटलास कॉप्को’ समूहासाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे; तसेच ‘मेक इन इंडिया’ मोहीम वेग घेत असताना अधिकाधिक जागतिक कंपन्या भारतात विस्तार करत आहेत. अपटाइम वाढवणे, दोष कमी करणे (चुका न करता), नवी उत्पादने दाखल करणे, उत्पादकता वाढवणे (माहितीच्या विश्लेषणाद्वारे), मानवी घटक आणि उर्जेच्या वापरात घट हे स्मार्ट कनेक्टेड अॅसेम्ब्लीचे फायदे सांगता येतील.

सध्याचे हे सादरीकरण पुण्यातील व आजूबाजूच्या निवडक ग्राहकांसाठी (आमंत्रणानुसार) असून, लवकरच भारतातील अन्य भागांतही ही सुविधा दाखल केली जाणार आहे.

‘अॅटलास कॉप्को’विषयी :
अॅटलास कॉप्को ही शाश्वत उत्पादकता सोल्यूशन्स देणारी जगभरातील आघाडीची कंपनी आहे. हा समूह ग्राहकांना नाविन्यपूर्ण कॉम्प्रेसर्स, व्हॅक्युम सोल्यूशन्स व एअर ट्रीटमेंट सिस्टीम्स, बांधकाम व खाणकाम उपकरण, पॉवर टूल्स व असेम्ब्ली सिस्टीम्स पुरवतो. अॅटलास कॉप्को उत्पादकता, ऊर्जाक्षमता, सुरक्षितता व अर्गोनॉमिक्स यावर भर दऊन उत्पादने व सेवा विकसित करते. कंपनीची स्थापना सन १८७३ मध्ये झाली असून, ती स्वीडनमधील स्टॉकहोम येथील कंपनी आहे आणि १८० हून अधिक देशांत कार्यरत आहे.

भारतातील अॅटलास कॉप्कोचे इंडस्ट्रीअल टेक्निक बिझनेस एरिया कस्टमर सेंटर अॅटलास कॉप्को, शिकागो न्युमॅटिक व देसोट्टर येथे मल्टिब्रँड कार्य आहे. हे केंद्र न्युमॅटिक व इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीअल साधनांची विक्री, मार्केटिंग व सर्व्हिस यांची जबाबदारी पार पाडते. इंडिया कस्टमर केअरमध्ये एकूण २२० कर्मचारी आहेत.  

अॅटलास कॉप्को (इंडिया) लि.ने सन १९६०मध्ये व्यवसायास सुरुवात केली आणि भारतात सर्वत्र २२ कार्यालये असून, नोंदणीकृत कार्यालय पुणे येथे आहे. ३१ मार्च २०१७पर्यंत अॅटलास कॉप्को (इंडिया) लि.कडे अंदाजे तीन हजार कर्मचारी आहेत व उत्पन्न तीन हजार ५०० कोटी रुपये आहे.

अधिक माहितीसाठी : https://atlascopco.com/in-en
अधिक माहितीसाठी संपर्क : सुषमा सिंग- (+९१) २०३९३ ९५२३४, ९३२५७ ०९८९०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link