पुणे : असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस यांच्या वतीने आयोजित ‘मेगा जॉब फेअर’ला चांगला प्रतिसाद मिळाला.
पुण्यातील कँप येथील ‘एमसीई’ सोसायटी येथे हा उपक्रम पार पडला. ६० कार्पोरेट कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. एक हजार १०० युवक-युवतींनी यासाठी नोंदणी केली. मुलाखतीनंतर १६० जणांना ऑफर लेटर देण्यात आले, तर ६०० जणांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवडण्यात आले आहे.
‘एमसीई’ सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी मेगा जॉब फेअरचे उद्घाटन केले. दक्खन मोमीन जमात या संघटनेने संयोजनात सहकार्य केले. अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे संचालक डॉ. आर. गणेसन यांनी स्वागत केले. असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्सचे इफ्तिकार शेख, रज्जाक शेख उपस्थित होते.