Next
‘डीकेटीई’च्या प्रा. सोनाली सूर्यवंशी यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

प्रा. सोनाली सूर्यवंशीइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनरल इंजिनीअरिंग विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. सोनाली सूर्यवंशी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजीअंतर्गत पीएचडी इन केमिस्ट्री ही पदवी प्राप्त झाली आहे.

प्रा. सूर्यवंशी या ‘डीकेटीई’मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, शिवाजी विद्यापीठातील केमिस्ट्री विभागातील प्रा. एस. आर. पाटील व राजाराम कॉलेजमधील प्रा. डॉ. ए. जे. बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘प्रिपरेशन अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ फलोरोसंट ऑरगॅनिक नॅनोपार्टीकल्स’ या विषयावर पीएचडी प्रबंध पूर्ण केला आहे. संशोधन करत असताना आवश्यक गुणधर्म असणाऱ्या सेंद्रीय फलोरोसंट (प्रकाश उत्प्रेरक) नॅनोपदार्थाची निर्मिती करून त्यांचा वापर निसर्गावरील परिणाम करणाऱ्या जड घटकांचा व पाण्यामधील घातक घटकांचे परिक्षण आणि मोजमापन प्रमाणित करण्यासाठी प्रा. सूर्यवंशी यांनी विकसित केलेल्या पद्धती आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.

पीएचडी प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांचे एकूण पाच रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले असून, त्यांना चार नॅशनल कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पेपर प्रेझंटेशन’ने गौरविण्यात आले आहे. प्रा. सूर्यवंशी यांनी पीएचडी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डॉ जे. एम. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search