Next
‘स्टार’मध्ये अस्सल रत्नागिरी आंबे उपलब्ध
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 02:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दररोज ताजी फळे आणि भाज्या पुरवण्याचे स्टारचे वचन कायम राखत मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोल्हापूरमध्ये ३४ वाणसामानाची रिटेल दुकाने असलेल्या टाटा-टेस्को एंटरप्राइजने आपल्या सर्व स्टोअर्समध्ये थेट बागेतून आणलेले अस्सल रत्नागिरी हापूस आंबे उपलब्ध केले आहेत.

ताज्या उत्पादनांच्या विक्रीत आघाडीवर असलेल्या स्टारतर्फे  भाज्या आणि फळांमधील बहुतांश उत्पादने थेट शेतातून आणली जातात. उत्तम दर्जाचे आंबे मिळवण्यासाठी स्टारने रत्नागिरीतील काही निवडक शेतकऱ्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे, आता नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि कार्बाइडमुक्त आंबे उपलब्ध होऊ शकतील.

या क्षेत्रात पहिल्यांदाच आकर्षक बॉक्समध्ये आंबे उपलब्ध होत आहेत. १२ आणि सहाच्या या बॉक्सवर संबंधित शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांचा फोटो असेल, त्यांची नावे, त्यांच्या शेताचा पत्ता आणि थेट खरेदीचा व्यवहार आणि अस्सल दर्जाबद्दलची माहिती असेल. या शिवाय प्रत्येक बॉक्सवर एक पोस्टकार्ड असेल. ग्राहक हे कार्ड वापरून शेतकऱ्याला आपला निरोप पाठवू शकतात. हे बॉक्स भेट देण्यासाठी आणि कौटुंबिक वापरासाठीही योग्य आहेत. या आंब्यांच्या किंमती परवडणाऱ्या असतील आणि ग्राहकांना आकर्षक ऑफर्सही मिळतील, याचीही काळजी स्टारतर्फे घेण्यात आली आहे.

‘आंबे उत्पादक शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ओळख मिळवून देण्याबरोबरच आमच्या ग्राहकांसाठी आम्ही नेमके कुठून आंबे आणलेत त्याचा माग काढणारा असा उपक्रम आम्ही आंब्यात मोसमात ‘स्टार’मध्ये सुरू केला याचा मला फारच आनंद आहे. आम्ही ऑरगॅनिक आणि ग्लोबल जीएपी प्रमाणित आंबेही उपलब्ध करून दिले आहेत आणि आमच्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. आमच्या ग्राहकांना दर्जेदार उत्पादने थेट शेतातून आणि तीही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला पुरक असाच हा उपक्रम आहे,’ असे ट्रेंट हायपरमार्केटचे व्यवस्थापकीय संचालक जमशेद डाबू म्हणाले.

रत्नागिरीतील ग्लोबल जीएपी प्रमाणित आंब्याचे उत्पादक सलील दामले म्हणाले, ‘लोकांना दर्जेदार हापूस मिळावा, यासाठी आम्ही जी मेहनत घेतो, त्या सर्व परिश्रमांना आदर आणि आम्हाला एक नवी ओळख ‘स्टार’च्या या उपक्रमातून मिळाली आहे. आम्हाला अधिक आत्मविश्वास देऊ करणाऱ्या आणि या लाखो डॉलरच्या व्यवसायात आम्हीही, लहान का असेना, एक भाग आहोत, हे सांगणाऱ्या या सक्षमीकरण करणाऱ्या कृतीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.’

रत्नागिरीतील ऑरगॅनिक आंब्याचे उत्पादक उमेश लांजेकर म्हणाले, ‘आम्ही ग्राहकांबद्दल फारच जागरुक आहोत. म्हणून आम्ही फक्त नैसर्गिकरित्या पिकवलेले, ज्यांना आपण ऑरगॅनिक आंबे म्हणतो, त्याच आंब्यांचे उत्पादन घेतो आणि विकतो. ‘स्टार’ने देशभरातील त्यांच्या स्टोअर्समध्ये हे ऑरगॅनिक आंबे विक्रीसाठी ठेवून आमच्या या स्थानिक उपक्रमाला एक राष्ट्रीय ओळख दिली आहे आणि त्यामुळे ग्राहकांनाही रसाळ हापूस आंब्याची अस्सल चव मिळणार आहे.’

ग्राहकांसाठी नवी आणि आकर्षक उत्पादने उत्तम दर्जाच्या वचनबद्धतेसह आणण्याच्या उद्देशाने ‘स्टार’ने ऑरगॅनिक आंबे आणि ग्लोबल जीएपी प्रमाणित शेतातील आंबेही उपलब्ध केले आहेत. ग्लोबल जीएपी हा आघाडीचा फार्म अशुरन्स कार्यक्रम असून, त्याद्वारे शेतीतील जबाबदार आणि शाश्वत पद्धतींच्या निकषांवर शेतीला प्रमाणन दिले जाते.

‘स्टार’बद्दल :
‘स्टार’ हा टाटा-टेस्कोचा उपक्रम म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उपलब्ध असलेली एक मल्टि-फॉरमॅट रिटेल चेन आहे. ताजी उत्पादने, ग्राहक सेवा आणि सोयीस्कररित्या विविध उत्पादनांची खरेदी करता यावी यासाठी ग्राहकांना एक आधुनिक खरेदीचा माहौल देण्यासाठी ‘स्टार’ प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये स्टारची ३४ स्टोअर्स आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link