Next
अवयवदानाच्या ऑनलाइन मोहिमेला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, August 11, 2018 | 12:20 PM
15 0 0
Share this storyपिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती मोहिमेअंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी अवयवदानाची ऑनलाइन मोहीम राबविण्यात आली व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. वैशाली भारंबे म्हणाल्या, ‘आजच्या परिस्थिती पाहिली, तर अवयव निकामी झाल्यामुळे पाच लाख लोक मरणाच्या दारात आहेत, त्यातील आठजणांचे जीव आपण एकटे वाचवू शकतो. दुर्देवाने अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अवयवदानाचा संकल्प सर्वांनी करावा. आपले अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात.’

अवयवदान करणे का गरजेचे आहे, कोणते अवयव आपण दान करू शकतो आणि केव्हा, त्याची प्रक्रिया काय आहे आदींबाबत डॉ. भारंबे यांनी माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ पुणेचे सदस्य गणेश जामगांवकर यांनी अवयवदान ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली आणि उपस्थितांना अवयवदान ऑनलाइन प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

दिवसभरात २५० जणांनी अवयवदानाविषयी माहिती घेतली. अनेकांनी ऑनलाइन प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी वर्ग यांच्याही सहभाग होता. अवयवदानाची ऑनलाइन प्रतिज्ञा प्रक्रिया प्रकिया मोबाइलद्वारे पूर्ण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अवयवदानासाठी भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रतिज्ञा मोहिमेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सहभाग होता. उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शन खाली ही मोहीम राबविण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link